

dimple kapadia
esakal
बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी होती. राजेश खन्ना यांना इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार म्हटलं जायचं. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना डिंपल यांच्याशी लग्न केलं. ज्यामुळे अनेकांना धक्का बसलेला. त्यांचा संसार सुखाचा चालेल असं वाटत असतानाच त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या आणि त्याची भांडणं इतकी वाढली की डिंपल यांनी आशीर्वाद बंगला सोडला. आता राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या अनिता अडवाणी यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचे खुलासे केलेत. राजेश खन्नांना घटस्फोट हवा होता पण डिंपल तो देत नव्हत्या असं त्या म्हणाल्या.