

DISHA VAKANI EXIT
esakal
DAYA BEN’S RETURN IMPOSSIBLE IN TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो चाहते आजही तितक्याच आवडीनं पाहतात. गेल्या २ दशकापासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतय. निर्माते असित मोदी यांच्यासोबत अनेकांचे खटके उडाल्यानं अनेक कलाकरांनी मालिका सोडली. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे जेनिफर मिस्त्री जिने या मालिकेत रोशनची भूमिका साकारली होती. मालिकेतून बाहेर आल्यावर जेनिफर यांची खूप चर्चा झाली. त्यांना देखील मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिशा वकाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.