Kon Honar Crorepati: माधुरी दीक्षितची एंट्री पण का बदलला 'कोण होणार करोडपती'चा होस्ट? सचिन खेडेकरांना सोनी मराठीने दाखवला बाहेरचा रस्ता?

REASON OF SACHIN KHEDEKAR EXIT FROM KON HONAAR CROREPATI: सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळेस सचिन खेडेकर होस्टच्या भूमिकेत नाहीत.
Madhuri Dixit

SACHIN KHEDKAR LEAVES KON HONAR CROREPATI

ESAKAL

Updated on: 

Kon Honar Crorepati: छोट्या पडद्यावरील गाजणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'कोण होणार करोडपती'. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ७ सीझन झाले आहेत. या कार्यक्रमाच्या पुढील सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रत्येक सीझनमध्ये अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत होते. मात्र अचानक सोनी मराठीने आताच्या नव्या सिझनचा होस्ट बदलल्याची घोषणा केली. या वर्षी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे आता सचिन या सीझनमध्ये का नाहीत असा प्रश्न विचारला जातोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com