Yed Lagla Premach: अतिशा नाईक पुन्हा साकारणार खलनायिका; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता

Atisha Naik: अतिशा नाईक (Atisha Naik) या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही.
अतिशा नाईक पुन्हा साकारणार खलनायिका;  'येड लागलं प्रेमाचं' मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
Atisha Naik In Yed Lagla Premachsakal

Atisha Naik In Yed Lagla Premach: 27 मे पासून येड लागलं प्रेमाचं (Yed Lagla Premach) ही नवीन मालिका स्टार प्रवाहवर सुरु होत आहे . या मालिकेत पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज ही या मालिकेची आणखी एक जमेची बाजू आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलच तिच्या मनात एक असूया आहे.

शशीकलाचं अधुरं स्वप्न

अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे. स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे, अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली.

अतिशा नाईक पुन्हा साकारणार खलनायिका;  'येड लागलं प्रेमाचं' मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
Yed Lagla Premach : विशाल-पूजाची 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका आहे 'या' गाजलेल्या मालिकेचा रिमेक

अतिशा नाईक भूमिकेविषयी म्हणाल्या...

शशीकला या भूमिकेबद्दल सांगताना अतिशा नाईक म्हणाल्या, "मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची बातच न्यारी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. शशीकलाच्या दागिन्यांची, तिच्या साड्यांची नक्कीच चर्चा रंगेल. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते. शशीकलाचे डाव यशस्वी होतात का हे पहायचं असेल तर नक्की पहा आमची नवी मालिका येड लागलं प्रेमाचं."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com