
Comedian Zakir Khan Shares Health Update with Fans
Esakal
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन जाकिर खान यानं स्टेज शो करण्यापासून काही काळ ब्रेक घेणार असल्याची घोषणा केलीय. तब्येतीचं कारण देत जाकिरने आता स्टेज शो तात्पुरते थांबवले असल्याचं स्पष्ट केलंय. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. जाकिरने म्हटलं की, माझी तब्येत गेल्या वर्षभरापासून बिघडत चाललीय. पण तरीही चाहते आणि स्टेजवरील प्रेमामुळे मी तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. पण आता काही काळ ब्रेक घेईन.