Premium|AI sleep combo drug : एआय सांगणार औषध घेण्याची वेळ, आरोग्य क्षेत्रात नवा प्रयोग

AI-Powered Medication Timing : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने औषध घेण्याची अचूक वेळ ठरवणाऱ्या नव्या तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो. मात्र, हे खरे औषध की फक्त स्मार्ट सॉफ्टवेअर यावर चर्चा सुरू आहे.
AI-Powered Medication Timing

AI-Powered Medication Timing

esakal

Updated on

ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com

दक्षिण कोरियाच्या कंपनीने जगातील पहिले ‘एआय-कॉम्बो ड्रग’ विकसित केले आहे. रुग्णाने एखादी गोळी कधी घ्यावी, याचे मार्गदर्शन हे तंत्रज्ञान करणार आहे. आता ही नवीन संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे एक खरेखुरे औषध ठरणार की केवळ एक चकाकणारे आकर्षक पॅकेजिंग, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.

दक्षिण कोरियाच्या एका स्टार्टअप कंपनीने जगातील पहिले ‘एआय-कॉम्बो ड्रग’ (AI-Combo Drug) विकसित केल्याचा दावा केला आहे. या दाव्याने आता नियामक संस्था, डॉक्टर आणि रुग्णांना एका मूलभूत प्रश्नाचा विचार करण्यास भाग पाडले आहे : रुग्णाने एखादी गोळी कधी घ्यावी हे सांगणाऱ्या अल्गोरिदमला स्वतःलाच एक ‘औषध’ मानले जाऊ शकते का?

सोल येथील ‘वेल्ट’ (WELT) या डिजिटल आरोग्य कंपनीने जानेवारीत झालेल्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ (CES) २०२६मध्ये ‘स्लीप-क्यू २.०’ (SleepQ २.०) सादर केले. तीव्र स्वरूपाच्या निद्रानाशावर (Chronic Insomnia) रामबाण उपाय म्हणून त्यांनी हे तंत्रज्ञान आणले आहे. विशेष म्हणजे याला दक्षिण कोरियन अन्न व औषध प्रशासनाची (KFDA) मंजुरी मिळाली असून, ‘सीई’ (CE) प्रमाणित डिजिटल थेरप्युटिक्स (DTx) म्हणून मान्यता मिळाली आहे. हे तंत्रज्ञान एका मोबाईल ॲप्लिकेशनला वैद्यकीय दर्जाच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ इंजिनशी जोडते. हे एआय इंजिन रुग्णाच्या बहुआयामी डेटाचे विश्लेषण करते. यामध्ये वेअरेबल गॅजेट्समधून मिळणारा बायोमेट्रिक डेटा, स्लीप डायरी, दैनंदिन जीवनशैलीच्या नोंदी आणि अगदी हवामानाचाही समावेश होतो. या सर्व घटकांचा अभ्यास करून हे ॲप निद्रानाशाचा त्रास नेमका कधी सुरू होऊ शकतो, याचे काही तास आधीच भाकीत करते आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली झोपेची गोळी घेण्याची सर्वात योग्य वेळ कोणती याची शिफारस करते.

हे उपचार सुरू करण्यासाठी रुग्णांना डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन ‘ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन’ (OCR) द्वारे किंवा औषधावर असलेल्या क्यूआर कोडद्वारे स्कॅन करावे लागते. या ॲपमधील ‘एजंट झेड’ (AgentZ) नावाचा संवाद साधणारा चॅटबॉट रुग्णांना त्यांच्या वर्तणुकीत बदल करण्यासाठी रोज मार्गदर्शन करतो. महत्त्वाचे म्हणजे ‘वेल्ट’ कंपनीने या ॲपमध्येच ‘रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल’ (RCT) ही क्लिनिकल चाचणी प्रणाली अंतर्भूत केली आहे. यामुळे हे व्यासपीठ जसजसे मोठे होईल तसतसे या उपचार अल्गोरिदमची वास्तविक जगातील वैद्यकीय परिणामकारकता तपासणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com