
Poor Air Quality In India :
२०२५ मी भारत सोडून कायमस्वरूपी सिंगापूर येथे स्थायिक होतोय...
कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे. मी येथील राजकारण्यांसोबत उभा राहू शकत नाही..
४० टक्के कर भरूनही प्रदूषित हवेत जगण्याची माझी इच्छा नाही. कोणाला काहीच पडलेलं नाही...
माझा तुम्हा सर्वांना प्रामाणिक सल्ला आहे की, तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तुम्हीपण हा देश सोडा...
गोव्यातील अभियंता सिद्धार्थ सिंग गौतम यांच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याच्या या पोस्टवर मतमतांतर आहेत. खरंच भारतात प्रदूषणाचा विळखा घट्ट होतोय का?
स्विस फर्म iqair च्या आकडेवारीनुसार जगातील १० पैकी आठ सर्वाधिक प्रदूषित शहरं ही गंगा-सिंधूंचे मैदान म्हणजेच भारत, पाकिस्तान, नेपाळ या पट्ट्यातील आहेत. शिकागोतील संस्थेच्या अहवालानुसार बिहार, चंदीगड, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल हा प्रदेश सर्वाधिक प्रदूषित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचा विचार केल्यास या प्रदेशातील प्रदूषण इतके भीषण आहे की सरासरी आयुष्य मर्यादा साडे पाच वर्षांनी घटत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.