Genetic testing for young athletes
esakal
Modern sports science and genetic profiling : क्रीडा विश्वात सध्या एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे वैभव सूर्यवंशी... १५ वर्षांच्या या पोराने क्रिकेटच्या मैदानात दबदबा निर्माण केला आहे. त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी सारेच आतुर असतात आणि सर्वांना आता प्रतीक्षा लागलीय ती त्याच्या भारताच्या सीनियर संघाकडून होणाऱ्या पदार्पणाची... महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने एक काळ असा गाजवला होता आणि आता वैभव तसेच प्रेम मिळवतोय. १५ वर्षीय वैभवला जे जमलं ते आपल्या मुलांनाही जमायला हवं, असा पालकांचा हट्टही वाढत चालला आहे. त्यामुळेच आपल्या लहानग्यांचे क्रिकेटचा सराव करणारे व्हिडीओ पोस्ट करण्यात सारे व्यग्र झालेले आहेत. सर्वांना आता वैभव सूर्यवंशी व्हायचंय, पण तुमचं शरीर काय म्हणतंय? कधी त्याचं ऐकलंत का?