Premium|West Bengal Election 2026 : बंगालचा गड सर आणि तामिळनाडूत 'विजय' उदय; ममता-स्टॅलिन यांच्या प्रादेशिक राजकारणाचा अस्त?

Sub-nationalism Challenges for BJP : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय आणि तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाचा उदय झाल्याने ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन यांच्या प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाला मोठा धक्का बसून देशात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे.
West Bengal Election 2026

West Bengal Election 2026

esakal

Updated on

श्रीराम पवार - shriram1.pawar@gmail.com

एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारशी पंगा घेणं हाच तमीळ अस्मितेचा जागर ठरवताना समोर उभं राहत असलेलं विजय यांचं आव्हान दुर्लक्षित केलं. त्याला प्रतिस्पर्धी मानलं नाही. इतक्या स्पर्धात्मक राजकारणात ‘नजर हटी-दुर्घटना घटी’ हेच वास्तव असतं. ममता आणि स्टॅलिन हे अलीकडच्या काळातील सर्वांत घोर भाजपविरोधी नेते निवडणुकीत कोसळले. भाजपला प्रादेशिकवादावर आधारित पर्याय देण्याच्या मर्यादा उघड झाल्या. देशपातळीवरील राजकारणासाठी नव्या समीकरणांची ही नांदी ठरेल.

पश्चिम बंगालमधील विजयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीने भाजप आणि संघ परिवाराला हवंहवंसं वाटणारं यश मिळवून दिलं आहे. प्रादेशिक अस्मिता आणि त्यावर आधारलेला उपराष्ट्रवाद (सबनॅशनलिझम) हा मोदी यांच्या सत्ताकाळातील भाजपसमोरचा सर्वांत मोठा अडथळा ठरत आला आहे. या राजकारणाचे दमदार आधार पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत साकारले. त्यातील बंगालचा गड सर करण्यात भाजपनं यश मिळवलं, तर तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय नावाचा नवा सितारा उदयाला आला. विजय यांच्या पहिल्याच ब्लाॅकबस्टर परफाॅर्मन्सने तमिळनाडूत ५० वर्षांत पहिल्यांदा सत्तेच्या राजकारणात तिसरा कोन आणला, जो भाजपच्या दक्षिण विजयाच्या स्वप्नात आणखी एक अडथळा बनणारा आहे. ममता बॅनर्जी यांचं संस्थान भाजपनं खालसा केलं. त्यात त्यांनी मतदारयाद्या फेरतपासणी, निवडणूक आयोग, केंद्रीय यंत्रणा याच्याशी झुंजण्यावर अतिरेकी भर देताना त्यांचा जनाधार काढून घेत चाललेल्या स्थानिक मुद्द्यांकडं दुर्लक्ष... यांचा वाटा मोठा आहे, तर तमिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारशी पंगा घेणं हाच तमीळ अस्मितेचा जागर ठरवताना समोर उभं राहतं असलेलं विजय यांचं आव्हान दुर्लक्षित केलं. त्याला प्रतिस्पर्धी मानलं नाही. इतक्या स्पर्धात्मक राजकारणात नजर हटी-दुर्घटना घटी हेच वास्तव असतं. ममता आणि स्टॅलिन हे अलीकडच्या काळातील सर्वात घोर भाजप विरोधी नेते निवडणुकीत कोसळले. भाजपला प्रादेशिकवादावर आधारित पर्याय देण्याच्या मर्यादा उघड झाल्या. देशपातळीवरील राजकारणासाठी नव्या समीकरणांची ही नांदी ठरेल.

West Bengal Election 2026
Premium|West Bengal Election 2026 : मोदी-ममता लढत! निवडणूक राज्याची, लक्ष ‘दिल्ली’कडे!!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com