

MK Stalin Result
ESakal
तामिळनाडूच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचा कोलाथूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. ही जागा त्यांचा बालेकिल्ला मानली जात होती. जिथे त्यांनी २०११, २०१६ आणि २०२१ मध्ये सातत्याने विजय मिळवला होता. यावेळी त्यांचे दीर्घकाळचे सहकारी आणि विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी त्यांचा पराभव केला आहे.