

Shramjeevi Sanghatana Movement
esakal
नेल्सन मंडेला मुक्ती चळवळीत सहभागी झालेले सदानंद वर्दे, विजय तेंडुलकर, संघटनेचे अध्यक्ष लहू पासारी. बोलताना मुसा मुल्ला.
सिद्धपीठाच्या विरोधात मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनातला सर्वोच्च अधिकारी संघटनेसोबत योजना आखत होता... जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी स्वत: फाटक्या आदिवासीला न्याय मिळवून देण्याची योजना शासकीय निवासस्थानात त्यांच्यासोबत आखत होते. राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या सिद्धपीठाला परास्त करण्याची योजना संघटनेसोबत ते ठरवीत होते... संघटनेसाठी हाच मोठा विजय होता.
आश्रमाभोवती सर्वत्र पोलिसच दिसायचे. त्यामुळे आश्रमाची गुर्मी अधिक वाढली होती. पोलिस संरक्षणात खुलेआम अन्याय सुरू होता; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आश्रमाचे धाबे दणाणले. भास्कररावांपुढे आश्रमाच्या विश्वस्तांनी अक्षरश: हात जोडले.