

विजय सांबरे
अश्माचमे मृत्तिकाचमे
गिरयश्यमे पर्वताश्यमे
वनस्पतयश्यमे हिरण्यचमे
अग्निश्यमे आपश्यमे
ग्राम्याश्यमे पशवआरण्याश्यमे
- रुद्राध्याय
(या शीला, दगड, माती, हे डोंगर पर्वत, हे वनस्पतिधन, सोने, ही ऊर्जा, हे पाणी, हे गाव (संस्कृती), पशू-पक्ष्यांसह अरण्य, हे सर्व माझे आहे. याचे जतन करणे ही माझी जबाबदारी आहे.)
सह्याचल वा हिमाचलमध्ये भटकल्यावर या संस्कृत श्लोकाची अनुभूती येते. त्यासाठी आदिवासींनी जपलेला जैवसांस्कृतिक वारसा व निसर्गपूजक जीवनशैली समजून घ्यायला हवी.