
कल्याणी शंकर
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला संघर्ष थांबविण्यामध्ये अमेरिकेच्या तथाकथित मध्यस्थीवरून सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. हा संघर्ष मीच थांबवला, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. दुसरीकडे भारत-पाकिस्तान संघर्षात तिसऱ्या देशाने मध्यस्थी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधीच्या निर्णयामागे अमेरिकेची भूमिका नक्की काय होती, कोणत्या पातळीवर याबाबत चर्चा झाली यांसारखे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला संघर्ष थांबविण्यामध्ये अमेरिकेच्या तथाकथित सहभागावरून सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. भारत-पाकिस्तानातील युद्ध मी थांबवले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करीत आहेत.