
Eknath Shinde Marathwada
esakal
जगदीश पानसरे
मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेची शक्ती क्षीण करण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बरेच यश मिळवले आहे. विधानसभेतील पराभवामुळे मराठवाड्यात काँग्रेस हतबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बीड वगळता इतर जिल्ह्यात फारसे मोठे नेते कोणी शिल्लक नाहीत.
त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये क्रमांक एकचा पक्ष होण्यासाठी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत आपण कुठेही कमी पडता कामा नये, याची तयारी शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यापासून सुरू केली आहे.