How to recover from a major financial loss : गौरी.. उच्चशिक्षित तरूणी.. शेअर मार्केटमध्ये नियमित गुंतवणूक करणारी, सातत्याने विविध आर्थिक गोष्टींचा अभ्यास करणारी. पण मधल्या काळात तिच्या मुलाचा मोठा हॉस्पिटलाचा खर्च झाला. इन्शुरन्स होता तरी हे तिला फायनान्शियली आणि मेंटली दमवणारं होतं. यात तिचा बराचसा पैसा गेला. याच काळात तिचे शेअर मार्केटकडे जास्त दुर्लक्ष झाले आणि तिला साधारण आठ ते नऊ लाखांचा फटका बसला. मुलांची शिक्षणं, त्यांचा दवाखाना, घराचे हफ्ते आणि बऱ्याच गोष्टी एकाच वेळी मॅनेज करताना तिची दमछाक झाली. तिने शेअर्समधले सगळे पैसे काढून घ्यायचे ठरवले.. तिला आता कोणतीच रिस्क नको होती. भविष्यात फायदा होईल असे शेअर्स तिला माहिती असूनही ती आता कोणतीच गुंतवणूक नव्याने करायला तयार नव्हती.
आपल्यातील अनेकांनाच पैशांचा कधी ना कधी मोठा झटका बसलेला असतो. असा झटका जो आपली पैसा जमवायची, खर्च करायची पद्धतच बदलायला लावतो. यालाच वैज्ञानिक भाषेत 'फायनान्शियल ट्रॉमा' म्हंटले जाते. आता हा फायनान्शियल ट्रॉमा म्हणजे काय, तो कशामुळे येतो, त्यावरची संशोधने काय सांगतात आणि या ट्रॉमातून बाहेर पडायचे काय मार्ग आहेत जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून...