Premium|Global Oil Dependency : तेलाचे 'व्यसन' की जगाची मजबुरी? १९७३ चा इतिहास आणि आजचे युद्ध; भारत इंधनाच्या पाशातून नेमका कधी मुक्त होणार?

Energy Crisis : पश्‍चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तेल संकट गडद झाले असून, १९७३च्या इतिहासातून बोध घेत डेन्मार्क, फ्रान्ससारख्या देशांनी स्वीकारलेला अपारंपरिक ऊर्जेचा मार्ग भारतानेही तातडीने अनुसरून ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण होणे ही काळाची गरज बनली आहे.
Global Oil Dependency

Global Oil Dependency

esakal

Updated on

हर्ष काबरा - saptrang@esakal.com

पश्‍चिम आशियातील ताज्या संघर्षाने एक जुना प्रश्न पुन्हा पेटवला आहे, ‘जग कच्च्या तेलाच्या व्यसनातून मुक्त होऊ शकते का?’ तेलाचा पाश तोडण्यासाठी १९७३चा इतिहास मार्गदर्शक ठरला आहे, परंतु पर्याय असूनही बदल का रेंगाळतो? अनेक देशांनी बदल स्वीकारले असून, भारतानेही पुढील विनाशकारी संकट येण्यापूर्वीच तेलावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने केलेले हल्ले जगाला एका अस्वस्थ करणाऱ्या सत्याची पुन्हा जाणीव करून देत आहेत : तेलाचे जागतिक व्यसन. दोन दशकांपूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी अमेरिकन काँग्रेससमोर एक प्रांजळ कबुली दिली होती. ‘‘अमेरिकेला तेलाचे व्यसन लागले आहे,’ असे ते म्हणाले होते, ‘‘आणि दुर्दैवाने हे तेल जगातील सर्वांत अस्थिर भागातून येते.’’ त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत, त्यांचे उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्युत  वाहनांवरील कर सवलतींना कात्री लावली आहे. इंधन कार्यक्षमतेचे नियम धाब्यावर बसवले आहेत. संरक्षण विभागाला अधिक कोळसा जाळण्याचे फर्मान सोडले आहे. जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेला जीवाश्म इंधनाच्या दावणीला बांधून, ते जणू एखादे ‘पेट्रो-स्टेट’ चालवण्याचे स्वप्न पाहत आहेत. हा विरोधाभास अतिशय क्रूर आहे. इराण हा तेलाचा मोठा उत्पादक आणि विलक्षण महत्त्वाच्या हॉर्मुझ सामुद्रधुनीचा रखवालदार आहे. ज्या ऊर्जा संकटापासून वाचवण्याचे आश्‍वासन ट्रम्प यांनी दिले होते, त्याच संकटाचे निखारे त्यांनी इस्राईलच्या साथीने इराणवर बॉम्ब डागून स्वतःच पेटवले आहेत. महागाईचे जे संकट दूर करण्याची त्यांनी हमी दिली होती, ते आता अधिकच तीव्र झाले आहे. गेल्या शतकापासून जगाचा व्यवहार तेलावर चालत आहे. जीवाश्म इंधनाने मानवी समृद्धीला गती दिली हे खरे; पण त्यानेच जागतिक संघर्षांनाही फुंकर घातली आहे. प्रादेशिक युद्धांमध्ये धर्माचे मतभेद केवळ ठिणगी टाकतात, पण तेल त्या युद्धांना इंधन पुरवते. ज्या तेलाने पश्‍चिम आशियाला श्रीमंत केले, त्याच तेलामुळे त्या प्रदेशाचा आर्थिक पाया आज हादरत आहे, हा एक अत्यंत क्लेशदायक योगायोग आहे.

Global Oil Dependency
Premium|Renewable Energy Projects : जीवाश्म इंधनाचे साठे संपण्यापूर्वीच जगाची पावले अपारंपरिक ऊर्जेकडे; सौदी, इजिप्तचे मोठे लक्ष्य!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com