
Gokul milk federation politics
esakal
निवास चौगले
गोकुळ’ ज्याच्या ताब्यात तो जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रावर हुकूमत गाजवू शकतो, हे आतापर्यंतच्या जिल्ह्यातील राजकारणाचे गणित राहिले आहे. गेली ३० वर्षे संघावर महादेवराव महाडिक अन् (कै). पी. एन. पाटील, अरुण नरके यांची एकहाती सत्ता होती. जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांच्या प्रवेशानंतर त्यांचाही संघात प्रवेश झाला, तो महाडिक-पी. एन. पाटील यांच्या हाताला धरूनच.
सुरुवातीच्या काही वर्षांत गुण्यागोविंदाने चाललेल्या या राजकारणात मिठाचा खडा पडला. त्याला महाडिक-सतेज वादाचे निमित्त ठरले. ‘गोकुळ’च्या सत्तेच्या जोरावर महाडिक यांनीही जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना आपल्या दारात यायला लावले. त्यात सतेज पाटील हेसुध्दा होते. (कै.) सदाशिवराव मंडलिक यांचा २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील अपवाद वगळता जिल्ह्याच्या राजकारणातील अशी एकही व्यक्ती नाही त्यांनी महाडिक यांची मदत घेतलेली नाही.