
Home Loan Rule
Sakal
Home Loan Rule: घर खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण ते स्वप्न कधी कधी आर्थिक संकट बनू शकतं, हे अनेकांना उशिरा समजतं. बहुतेक लोक होम लोन घेतात आणि कमी EMI पाहून खूश होतात. पण “कमी EMI” असला तरी तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होते.
चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं की, 50 लाखांच्या होम लोनवर स्मार्ट रिपेमेंट करून तब्बल 36 लाख रुपयांची बचत करणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी लोन घेण्याच्या पद्धतीपासून ते परतफेडीच्या स्ट्रॅटेजीपर्यंत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.