
सुजित गायकवाड
नवी मुंबईमध्ये रस्त्यांसह पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे या कामांनंतरही वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सातत्याने होणारी कोंडी हीच नवी मुंबईची प्रमुख समस्या आहे.
कोकणचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहराला ओळखले जाते. मुंबई सोडल्यानंतर पनवेल पोहोचेपर्यंत दोन ते तीन तास लागायचे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशी हैराण होत असे.
पण सायन-पनवेल महामार्गाच्या विकासामुळे पनवेलला एक अधिक वेगवान प्रवास प्रदान केला. कळंबोली ते मानखुर्दपर्यंतच्या सायन-पनवेल महामार्गावर केलेल्या सहा पदरीकरणामुळे अतिवेगात वाहने पनवेलला पोहोचू लागली.