Premium|Study Room : स्वतंत्र भारतात ८० वर्षांत रोजगाराचा विकास कसा झाला?

India Unemployment History 1950 to 1970 : स्वातंत्र्याची ८० वर्षे: जागतिक महासत्ता पण बेरोजगारीचे अस्वस्थ करणारे आव्हान कायम!
India Unemployment History 1950 to 1970

India Unemployment History 1950 to 1970

esakal

Updated on

लेखक - प्रवीण राऊत

पहिला टप्पा : १९५० ते १९७० विकास प्रक्रियावर भर

१५ ऑगस्ट २०२६ रोजी आपला देश स्वतंत्र भारताची ८० वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण करत आहे. गेल्या आठ दशकांत भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास या क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. जगातील एक प्रमुख महासत्ता म्हणून भारताचा दबदबा आज जागतिक पातळीवर वाढत आहे.

​परंतु, या सुवर्णमहोत्सवी प्रवासात मागे वळून पाहताना एक अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती प्रकर्षाने समोर येते - १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल, तेव्हा देशासमोर ज्या प्रमुख समस्या होत्या, त्यातील अनेक समस्या जरी आटोक्यात आल्या असल्या, तरी बेरोजगारी हे आव्हान आजही कायम आहे आणि ते संपलेले नाही.

​सरकारचा असा अंदाज होता की कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला की देशाचा आर्थिक विकास (Economic Growth) होईल. या आर्थिक विकासाचा फायदा हळूहळू खालच्या स्तरापर्यंत पोहोचेल (Trickle-Down Effect), ज्यामुळे आपोआप अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होईल आणि गरिबी कमी होईल,असा अंदाज करण्यात आला होता. परंतु १९५० ते १९८० या ३० वर्षांच्या काळात अप्रत्यक्ष परिणामांवर ठेवलेला विश्वास फोल ठरला.यामध्ये जी गरीबी कमी व्हायला होती, जी बेरोजगारी कमी व्हायला हवी होती ती होत नव्हती. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने १९७२-७३ मध्ये दुष्काळ निवारण आणि ग्रामीण भागातील लोकांना शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी देशातील सर्वात पहिली रोजगार योजना राबवली. आणि योजनेचे अद्भुत यश लक्षात घेता केंद्र सरकारने सुद्धा विशेष रोजगार निर्माण होतील अशा योजना तयार केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com