

Impact of Paper Leak on Students
esakal
लेखक : अभिजित मोदे
भारतात गेल्या काही वर्षांत परीक्षांच्या पेपर लीकच्या प्रकरणांत गंभीर वाढ झाली आहे. २०१९ पासून देशात ६५ हून अधिक मोठ्या परीक्षांचे पेपर लीक झाल्याचे आढळून आले आहे. केवळ NEET-UG चीच नाही, तर १९ राज्यांमधील ६४ इतर महत्त्वाच्या परीक्षासुद्धा पेपर लीकने हादरल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य या पेपरफुटीमुळे धोक्यात आले आहे आणि संपूर्ण परीक्षा प्रणालीची विश्वासार्हताच प्रश्नांच्या कचाट्यात सापडली आहे.
पेपर लीकमुळे सर्वप्रथम मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. जे विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून तयारी करतात, त्यांच्यापेक्षा ज्यांना लीक केलेला पेपर मिळतो, त्यांना अन्यायकारक लाभ मिळतो. अंदाजे १.४ कोटीहून अधिक उमेदवारांचे भविष्य या पेपर लीकमुळे धोक्यात आले आहे. हे केवळ आर्थिक नुकसान नसून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक ताण, हताशा आणि नैराश्य निर्माण करते.