Premium|Study Room : डिजिटल तंत्रज्ञानामुळे अन्न सुरक्षा व्यवस्थेत होत आहे मोठे परिवर्तन

Digital Transformation in Food Safety : भारतातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानामुळे मोठा बदल घडत आहे. ऑनलाइन परवाने, मोबाइल तपासणी आणि केंद्रीकृत डेटा प्रणालीमुळे अन्न व्यवसायांवर अधिक प्रभावी व पारदर्शक नियंत्रण शक्य होत आहे.
Digital Transformation in Food Safety

Digital Transformation in Food Safety

esakal

Updated on

लेखक : श्रीकांत जाधव

भारतासारख्या खंडप्राय, प्रचंड लोकसंख्येच्या आणि कमालीच्या वैविध्यपूर्ण देशात प्रत्येकाला सुरक्षित आणि सकस अन्न मिळेल याची खात्री करणे, हे महाकाय आणि अत्यंत गुंतागुंतीचे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी झपाट्याने बदलल्या आहेत. वेगाने होणारे शहरीकरण, वाढता अन्न प्रक्रिया (Food Processing) उद्योग आणि विशेषतः 'स्विगी', 'झोमॅटो' यांसारख्या डिजिटल फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सचा झालेला स्फोट यामुळे आजवर कधीही नव्हती इतकी अन्न सुरक्षा नियमनाची गरज निर्माण झाली आहे. देशभरातील तब्बल ६० लाख 'अन्न व्यवसाय ऑपरेटर्स'चे (FBOs) एवढे मोठे जाळे हाताळण्यासाठी 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण' (FSSAI) आता पूर्णपणे तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. 'डिजिटल इंडिया' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अन्न सुरक्षा प्रशासनाशी सांगड घातली जात आहे. यामुळे एकेकाळी अत्यंत संथ आणि घटना घडल्यानंतरच सक्रिय होणारी प्रशासकीय व्यवस्था आता अधिक स्मार्ट, प्रतिबंधात्मक आणि 'डेटा-आधारित' बनत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com