

India R&D expenditure percentage of GDP
esakal
भारताला खरोखरच आर्थिक प्रगतीच्या बाबतीत झेप घ्यायची असेल तर शिक्षणावरील गुंतवणूक वाढवावी लागेल. वैज्ञानिक शोध आणि संशोधनावर होत असलेल्या अल्प खर्चामुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान मागे राहात आहे.
जागतिक पातळीवर एखाद्या देशाची आर्थिक शक्ती मोजण्याचे विविध निकष आहेत. त्यापैकी देशात लागणारे नवनवीन वैज्ञानिक शोध, बौद्धिक संपदा अधिकारांची नोंदणी यांच्या प्रमाणानुसारदेखील देशाची आर्थिक ताकद निर्धारित केली जाते. त्यानुषंगाने जागतिक पातळीवर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे (डब्ल्यूआयपीओ) जागतिक शोध निर्देशांकाचे गणन केले जाते. त्यासाठी देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्था, मानवी भांडवल आणि संशोधन, पायाभूत सुविधा, `बाजारसभ्यता’, ‘व्यवसायसभ्यता’ या घटकांचा आधार घेतला जातो. या निर्देशांकाच्या मूल्यानुसार सहभागी देशांना क्रम दिला जातो.