Premium|Leopard-Human Conflict : बिबट-मानव संघर्ष धोक्याची घंटा

Human-wildlife conflict solutions India : पुणे-जुन्नर येथे २००१-०२ मध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानंतर मोठी कारवाई झाली होती, पण आता सातारा जिल्ह्यातील कराड-पाटण तालुक्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाहेरील उसाच्या पट्ट्यात बिबट्यांची संख्या जुन्नरखालोखाल सर्वाधिक आहे; कारण साखर कारखान्यांमुळे निर्माण झालेल्या ऊस शेतीत बिबट्याच्या अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत आणि त्यांच्यात जनुकीय बदल झाले आहेत.
Human-wildlife conflict solutions India

Human-wildlife conflict solutions India

esakal

Updated on

रोहन भाटे - rohanbhate@gmail.com

राज्यभरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. थेट लोकांच्या घरात शिरून बिबट्याने हल्ले करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मानवी वस्तीतील बिबट्यांचे आक्रमण थांबवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. बिबट-मानव संघर्ष धोक्याची घंटा ठरू लागला आहे. बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी वन विभागाला गांभीर्याने विचार करावा लागेल.

कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी, शेडगेवाडी, पाली इत्यादी साखर कारखान्यांमुळे उसाची प्रचंड लागवड झाली आहे. उसाने बिबट्याच्या जवळजवळ सर्व गरजा भागवल्या आहेत. आज जवळपास दोन दशके बिबट्याचे यशस्वी प्रजनन उसाच्या रानात होत आहे. बिबट्याच्या जवळपास तीन ते चार पिढ्या उसात जन्माला आल्या आहेत. त्यांच्या मेंदूत जनुकीय बदल झाले आहेत. बिबट्या नर-मादीने आपल्या जन्माला येणाऱ्या पिलांना उसाचे रान म्हणजेच आपले घर म्हणून त्यांना गर्भात बिंबवले आहे. हा एक जनुकीय बदल आहे. अनेक बिबट्यांना जेरबंद करून वन विभागाने अभयारण्यात वा जंगलात पुन्हा सोडलेही; मात्र त्या बिबट्यांना जंगल हे आपले घर माहीत नाही. ते उसाच्या रानालाच आपले सुरक्षित घर मानतात व पुन्हा तिथेच येतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com