
एक पिक्चर सुपरहिट होने दे यार... असं म्हणण्यात अनेक अर्थ दडलेले असतात. एकदा का आपला चित्रपट भारी लोकप्रिय ठरला की आपल्याला नवीन चित्रपटासाठी करारबद्ध करण्यासाठी घराबाहेर रांग लागेल, चाहत्यांची संख्या भरभर वाढेल, कुठेही आलो-गेलो, परतलो तरी प्रसारमाध्यमे फ्लॅश उडवत राहतील, सतत प्रकाशात राहता येईल, असे स्वप्न मनात ठसत असे.
माधुरी दीक्षितचे तर एक नव्हे तर लागोपाठ तीन चित्रपट रौप्यमहोत्सवी लोकप्रिय. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’ (दिवाळी १९८८), सुभाष घई दिग्दर्शित ‘राम लखन’ (१९८९) आणि राजीव राॅय दिग्दर्शित ‘त्रिदेव’ (१९८९). सोबतचे छायाचित्र ‘त्रिदेव’च्या मुहूर्ताच्या वेळचे आणि त्यात पटकन लक्ष वेधून घेतेय ती आपली माधुरी दीक्षित. तिचं कायमस्वरूपी हास्य प्रत्यक्षात, पडद्यावर आणि असे अनेक फोटोतही.