
डॉ. सुरेश नाईक
‘निसार मिशन’ हे केवळ अंतराळात एक उपग्रह पाठवणार नाही, तर भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री, विश्वास आणि तांत्रिक सहकार्याचा एक मजबूत दुवा म्हणून इतिहासात नोंदले जाईल.
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेचे राष्ट्रीय वैमानिक व अंतराळ प्रशासन (नासा) यांनी एकत्रितपणे एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.