Premium|Netherlands Development Model : शिस्त, प्रामाणिकपणा आणि बुद्धिप्रामाण्यवादाने घडलेला नेदरलँड्सचा विकासमॉडेल भारतासाठी प्रेरणादायी आरसा

Holland Tourism and Economy : समुद्रावर विजय मिळवणारा नेदरलँड्स हा देश कृषी आणि जलव्यवस्थापनात जगात अग्रेसर आहे. साधी राहणीमान, श्रमाची प्रतिष्ठा आणि सायकल संस्कृती यामुळे हा देश समृद्ध बनला असून भारतीयांसाठी तो प्रगतीचा एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.
Netherlands Development Model

Netherlands Development Model

esakal

Updated on

डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com

यंदाच्या वर्षी शिवजयंतीनिमित्त नेदरलँड्समधील एका कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग जुळून आला. त्यानिमित्ताने नेदरलँड्स देशाची भ्रमंतीही करता आली. तेथील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कृषी क्षेत्राचे अवलोकन करता आले. त्यातून एक शिस्तबद्ध अन् प्रागतिक देश उलगडत गेला.

नेदरलँड्स म्हणजे डच नागरिकांचा देश. नेदरलँड्सचा अर्थ ‘खालची जमीन’... म्हणजे समुद्रसपाटीपासून खाली असणारी भूमी. नेदरलँड्स देश हाॅलंड नावानेही ओळखला जातो. नेदरलँड्सची सुमारे ४० टक्के जमीन पूरप्रवण असून त्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी डेल्टा प्रोजेक्ट राबवलेला आहे. म्हणजे त्यांनी समुद्रावर नियंत्रण मिळवून जमिनीचे व्यवस्थापन केलेले आहे. १९५३ मध्ये नेदरलँड्समध्ये मोठा पूर आला होता आणि त्यात हजारो नागरिक मरण पावले होते. त्यानंतर त्यांनी ऱ्हाईन नदीवर समुद्र अडविणारा लोखंडी चलित बांध घातला व पाण्याचे व्यवस्थापन केले. तेव्हापासून नेदरलँड्सची जीवितहानी झाली नाही. त्यांनी समुद्रावर विजय मिळविला. आज जगातील सर्वात मोठे जलव्यवस्थापन नेदरलँड्सचे आहे. अनेक कालवे काढून त्याभोवती घरे उभारून प्रतिकूल परिस्थितीचे त्यांनी सौंदर्यात रूपांतर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com