

Gaming Addiction: Why Online Games Are Becoming a Dangerous Debt Trap
E sakal
Online Gaming Addiction: From Gaming to Debt, Why Are People Taking Extreme Steps?
सावंतवाडीतील सातार्डा रायाचे पेड हे सिंधुदुर्गातलं एक छोटं गाव. साधारण दोन अडीच हजार लोकसंख्येचं. तेरेखोल नदीच्या किनारी वसलेल्या या गावातल्या मायलेकांनी नदीच्या पात्रात स्वत:ला झोकून दिलं. कारण होतं, ऑनलाइन गेमिंग.
ही एकच घटना नव्हे. अशा कित्येक बातम्या आपण रोज वाचतो. ऑनलाइन गेमिंगचा विळखा सगळीकडेच वाढतोय. गावं, शहरं, स्त्री-पुरुष, लहान-थोर सगळ्यांना त्याची भीती आहे. जवळपास चौपटीने हे गुन्हे वाढल्याचं काही अहवाल सांगतात.
ऑनलाइन गेमिंगचं एवढं वेड का, त्यामुळे लोकं अक्षरश: कर्जबाजारी का होतायत आणि ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यापासून सुरक्षित कसं राहायचं? सगळं समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.