या ‘काडी’ मुळे भडकणार आणखी महागाई | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या ‘काडी’ मुळे भडकणार आणखी महागाई}

या ‘काडी’ मुळे भडकणार आणखी महागाई

आपण दररोज अनेक गोष्टींचा वापर करतो, परंतु त्याची निर्मिती कशी होते, याबाबत माहिती असेलच असे नाही. उदा. भांड्याची घासणी, झाडू आणि एवढेच नाही तर काडीपेटी. सुमारे शंभर दीडशे वर्षाचा इतिहास लाभलेल्या काडीपेटीबद्धल लिहावे असे फारसे कोणाला वाटत नाही. कारण काडीपेटी ही मुळातच किरकोळ आणि नगण्य बाब मानली जाते आणि त्यावर काय लिहावे, असाही अनेकांना प्रश्‍न पडतो. परंतु याच काडीपेटीने वणवा पेटतो ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ग्रामीण भागातील एका वस्तीवर असलेल्या घरात दिसणारी काडीपेटी ही उच्चभ्रु भागातील एका आलिशान बंगल्यातही दिसते. कारण काडीपेटीची अनिवार्यता ही कधी न संपणारी नाही.

स्वयंपाकासाठी चूल पेटवण्यासाठी, देवासमोर दिवा लावण्यासाठी काडीपेटीचा उपयोग साधारणपणे केला जातो. याच काडीचा गैरवापरही केला गेला आहे. म्हणूनच काही जण मिश्‍किलीने ‘काडी’ टाकण्याचे काम करू नको, असेही म्हणतात. विनोदाचा भाग सोडा, काडीपेटीचे महत्त्व हे कधी न संपणारे नाही. काडीपेटीचे आकर्षण लहान मुलांनाही असते. कारण एका काडीतून निघणारी आग पाहताना त्यांना विलक्षण आनंद होतो. पण अपघात होण्याचाही तितकाच धोका असतो.म्हणूनच घरातील मंडळी मुलांना काडीपेटीपासून दूर ठेवतात. हीच काडीपेटी आता एक रुपयाने महाग होत आहे. आजच्या काळात एक रुपया ही किंमत खूपच कमी वाटत असली तरी उद्योजकांसाठी आणि कामगारांसाठी खूप अधिक आहे.

हेही वाचा: दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा!

एकीकडे पेट्रोल आणि डिझेल, गॅसच्या किमती भडकलेल्या असताना आता दररोजच्या वापरात असणारी काडीपेटी देखील महागाईची ‘आग’ आणखी भडकवणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल चौदा वर्षानंतर काडीपेटीची किंमत प्रथमच रुपयाने वाढत आहे. सध्या एक रुपयाला मिळणारी काडीपेटी आता दोन रुपयाला मिळणार आहे. अर्थात नवीन किमती एक डिसेंबरपासून लागू झाले आहेत. देशातील पाच प्रमुख काडीपेटी उद्योग समूहाच्या सर्वसंमतीने किंमत वाढविण्यावर शिक्कामोर्तब केले.यापूर्वी २००७ मध्ये काडीपेटीच्या किमतीबाबत आढावा घेण्यात आला होता. तेव्हा ५० पैशावरून एक रुपया किंमत करण्यात आली होती. अलीकडेच शिवकाशी येथे बैठक घेण्यात आली आणि त्यात काडीपेटीची किंमत वाढवण्याचे निश्‍चित करण्यात आले.

काडीपेटीतील एक काडी तयार करण्यासाठी दहापेक्षा अधिक प्रकारच्या कच्च्या मालाची गरज भासते. काही वर्षांपासून कच्च्या मालाची किंमत वाढत असली तरी काडीपेटीची किंमत कायम ठेवली होती. पण कच्च्या मालाचे भाव आता आटोक्याबाहेर गेल्याने सध्याच्या किमतीत काडीपेटी विकणे शक्य होत नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. एक किलो ग्रॅम लाल फॉस्फरसची किंमत ४२५ वरून ८१० रुपये झाली आहे. मेण ५८ रुपयांवरून ८० रुपये, पेटीचा बोर्ड ३६ रुपयांवरून ५५ रुपये आणि आतील पेटीची किंमत ३२ रुपयांवरून ५८ रुपयावर पोचली. कागद, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर याच्या किमती देखील वाढल्या आहेत.

काडीपेटीची किंमत वाढल्यास कामगारांचे वेतन वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. काडीपेटी निर्माते सध्या ६०० काडीपेटी (प्रत्येक बॉक्समध्ये ५० काड्या) चे एक बंडल २७० ते ३०० रुपयांनी विक्री करत आहेत. परंतु आता त्याचे विक्री मूल्य ६० टक्कयांने वाढवून ते ४३० ते ४८० रुपये प्रति बंडल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या एका डबीत ३६ काड्या मिळतात. परंतु नव्या भाववाढीबरोबरच एका डबीतील काडीची संख्या वाढवली असून ती आता ५० करण्यात आली आहे. त्यानुसार दोन रुपयांत ५० काड्याची पेटी मिळेल. या दरवाढीमुळे कच्या मालाची झालेली भाववाढ काही प्रमाणात नियंत्रित करता येईल, अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. या व्यवसायात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे पाच लाख कामगार कामगार काम करतात आणि त्यापैकी ९० टक्के महिला आहेत.

हेही वाचा: एकाच गावात राज्यातील सर्व गडकिल्ले!

गरिबांपासून ते गर्भश्रीमंताच्या स्वयंपाकघरात दिसणारी काडीपेटीचे ओझे कोणालाच कधीही वाटले नाही. २५ पैशाला असताना आणि आता दोन रुपयांपर्यंत काडीपेटीची किंमत झाली तरी सामान्यांना त्याची फारशी झळ बसणार नाही. मुळातच अन्य वस्तूंचे कडाडलेले भाव आणि काडीपेटीची किंमत पाहिली असता एक रुपयाची वाढ फारशी झळ बसवणारी नाही. उलट वर्षानुवर्षे काडीपेटी उद्योगात असणाऱ्या महिला आणि पुरुषांना आर्थिक आधार ठरू शकेल. घरोघरी दिसणाऱ्या या काडीपेटीचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. आग प्रज्वलित करणाऱ्या काडीचा शोध ३१ डिसेंबर १९८२७ रोजी लागला. ब्रिटनचे शास्त्रज्ञ जॉन वॉकर यांनी अशा काडीचा शोध लावला की ती कोठेही घासली तरी ती पेटायची. अर्थात हा प्रयोग धोकादायक होता. त्यामुळे अनेकांना जीव गमावावे लागले. त्यांनी ॲटीमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट आणि स्टार्चचा वापर केला होता. घासण्यासाठी सँडपेपरचा वापर केला जात असे. परिणामी लहान काडीने देखील मोठी आग लागत होती. कालांतराने त्यात सुधारणा करण्यात आली. १९३२ मध्ये फ्रान्समध्ये ॲटीमनी सल्फाइडच्या ठिकाणी फॉस्फरसचा वापर केला गेला. काडी पेटल्यानंतर येणारा वास कमी करण्यासाठी त्यात गंधकाचा वापर केला गेला. परंतु आगीतून निघणारा धूर हा अपायकारक होता. त्यानंतर १८५५ मध्ये स्वीडन येथे ट्यूबकर यांनी अन्य रासायनिक पदार्थाचा वापर करून एक सुरक्षित काडी तयार केली आणि आजतागायत त्याचा वापर केला जात आहे.

परंतु आता त्याचे विक्री मूल्य ६० टक्कयांने वाढवून ते ४३० ते ४८० रुपये प्रति बंडल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या एका डबीत ३६ काड्या मिळतात. परंतु नव्या भाववाढीबरोबरच एका डबीतील काडीची संख्या वाढवली असून ती आता ५० करण्यात आली आहे. त्यानुसार दोन रुपयांत ५० काड्याची पेटी मिळेल. या दरवाढीमुळे कच्या मालाची झालेली भाववाढ काही प्रमाणात नियंत्रित करता येईल, अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. या व्यवसायात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे पाच लाख कामगार कामगार काम करतात आणि त्यापैकी ९० टक्के महिला आहेत.

हेही वाचा: नगरसेवक व्हायचंय! निवडणूक जिंकण्यासाठी 'अशी' करा तयारी

गरिबांपासून ते गर्भश्रीमंताच्या स्वयंपाकघरात दिसणारी काडीपेटीचे ओझे कोणालाच कधीही वाटले नाही. २५ पैशाला असताना आणि आता दोन रुपयांपर्यंत काडीपेटीची किंमत झाली तरी सामान्यांना त्याची फारशी झळ बसणार नाही. मुळातच अन्य वस्तूंचे कडाडलेले भाव आणि काडीपेटीची किंमत पाहिली असता एक रुपयाची वाढ फारशी झळ बसवणारी नाही. उलट वर्षानुवर्षे काडीपेटी उद्योगात असणाऱ्या महिला आणि पुरुषांना आर्थिक आधार ठरू शकेल. घरोघरी दिसणाऱ्या या काडीपेटीचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. आग प्रज्वलित करणाऱ्या काडीचा शोध ३१ डिसेंबर १९८२७ रोजी लागला. ब्रिटनचे शास्त्रज्ञ जॉन वॉकर यांनी अशा काडीचा शोध लावला की ती कोठेही घासली तरी ती पेटायची.

अर्थात हा प्रयोग धोकादायक होता. त्यामुळे अनेकांना जीव गमावावे लागले. त्यांनी ॲटीमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट आणि स्टार्चचा वापर केला होता. घासण्यासाठी सँडपेपरचा वापर केला जात असे. परिणामी लहान काडीने देखील मोठी आग लागत होती. कालांतराने त्यात सुधारणा करण्यात आली. १९३२ मध्ये फ्रान्समध्ये ॲटीमनी सल्फाइडच्या ठिकाणी फॉस्फरसचा वापर केला गेला. काडी पेटल्यानंतर येणारा वास कमी करण्यासाठी त्यात गंधकाचा वापर केला गेला. परंतु आगीतून निघणारा धूर हा अपायकारक होता. त्यानंतर १८५५ मध्ये स्वीडन येथे ट्यूबकर यांनी अन्य रासायनिक पदार्थाचा वापर करून एक सुरक्षित काडी तयार केली आणि आजतागायत त्याचा वापर केला जात आहे.

हेही वाचा: तुमच्या गुंतवणुकीत ‘ईएसजी’ आहे का?

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात काडीपेटीचा वापर होऊ लागला. सुरवातीला काडीपेटीची आयात केली जात होती. कालांतराने स्थानिक पातळीवर उत्पादन होऊ लागले. १८९५ मध्ये गुजरात इस्लाम मॅच फॅक्टरीची अहमदाबादेत स्थापना झाली होती. पण १९२१ पर्यंत काडीपेटी उद्योगाला कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक यश मिळाले नव्हते. गैरव्यवस्थापन, भांडवलाची कमतरता, चुकीचे स्थान, टिंबर पुरवठ्यातील अडचणी आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा अभावामुळे काडीपेटी उद्योग फारसा वाढला नाही. काडीपेटी उद्योगाचा हा खटाटोप १९२२ पर्यंत सुरू होता. तोपर्यंत काडीपेटी आयातीवर दीड रुपये महसूल कर आकारला जात होता. या करामुळे स्थानिक पातळीवर अनेक कारखाने सुरू झाले आणि ते व्यावसायिकरित्या यशस्वी होऊ लागले. पहिल्या जागतिक महायुद्धापूर्वी भारतीय बाजारपेठेत जपान, स्वीडन आणि अन्य युरोपिय देशांतून मोठ्या प्रमाणात काडीपेटीची आयात केली जात होती.

हेही वाचा: संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल?

१९१२-१३ रोजी एकूण १५.१२ दशलक्ष काडीपेटी आयातीपैकी निम्मी आयात ७.२९ दशलक्ष ही एकटा जपान भारताला करत होता. हे प्रमाण १९१८ पर्यंत कायम राहिले. नंतर जपान आणि स्वीडन यांच्यात भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. स्वीडिश मॅच कंपनी ही तत्कालीन काळात शक्तीशाली कंपनी ओळखली जात होती. स्वीडनने स्थानिक कारखानदारांच्या मदतीने काडीपेटी निर्मिती सुरू केल्याने १९२३ -२४ काळात जपानने बऱ्याच प्रमाणात बाजारपेठ गमावली. स्वीडनच्या एका काडीपेटी निर्मात्या कंपनीने भारतात कारखाना सुरू केला होता. ही कंपनी वेस्टर्न इंडिया मॅच कंपनीने काम करत होती. यादरम्यान भारतातील कंपन्या या जागतिक कंपन्यांबरोबरच अंतर्गत स्पर्धेचाही सामना करत होत्या.

भारतात १९२७ च्या मध्ये शिवकाशी येथे नाडर बंधूंनी काडीपेटीचे उत्पादन सुरू झाले. पूर्वी मॅचस्टिक्स हाताने तयार करावी लागत होती. हातानेच त्याच्या टोकावर मसाला लावला जात असे. काडीपेटी देखील लाकडी तुकड्यापासून तयार केले जात होती. त्यानंतर मशिनचा वापर होऊ लागला. आता काडीपेटी मशिनने तयार केली जाते. काडी, बॉक्स, काडीवरील मसाला लावणे, वाळवणे, बॉक्सवर मसाला लावणे, लेबल चिटकवणे, बॉक्समध्ये काडीपेटी भरणे आदी सर्व कामे मशिनने पार पाडली जातात. भारतात आजही बहुतांश कारखान्यात हातानेच काडीपेटी तयार केली जाते.

काडीपेटी उद्योगासमोरील आव्हाने


काडीपेटी उत्पादनात वाढता खर्च, लायटरचा वाढता वापर तसेच धुम्रपानाबाबत वाढलेली जनजागृती पाहता काडीपेटी उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा ठरवले असले तरी पूर्वीच्या तुलनेत काडीपेटीला मागणी कमी राहत आहे. काडीपेटी उद्योगातील वाढती अनिश्‍चितता पाहता अनेक निर्मात्यांनी टेक्स्टाईल आणि पेपर उद्योगाचा पर्याय निवडला आहे. तमिळनाडूच्या कोविलपट्टी परिसरातील या उद्योगात सुमारे चार लाखांहून अधिक कामगार काम करतात. त्यात ९० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात ८० टक्के रोजगार हा तमिळनाडूतील काडीपेटी उद्योगात आहे. दहा पंधरा वर्षापूर्वी या भागात सुमारे दहा हजार कारखाने होते, परंतु आता तीच संख्या हजारावर आली आहे. काही उद्योजकांच्या मते, काडीपेटीच्या किमती वाढविण्याऐवजी काड्यांची संख्या कमी करणे आणि निर्यातीवर भर देणे गरजेचे आहे आणि त्यानुसार स्थानिक उद्योजकांनी योजना आखली असल्याचे कोविलपट्टीचे निर्माते सांगतात. सध्या एका काडीपेटीची किंमत एक रुपया असून तेवढे पैसे देण्यासाठी देखील ग्राहक तयार नाहीत.

येत्या १ डिसेंबरपासून काडीपेटीची किंमत दोन रुपयाने होत असताना त्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर काडीपेटी उद्योगाचे भवितव्य अवलंबून असेल. तमिळनाडूच्या काडीपेटीला नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकेत मागणी आहे. अर्थात आफ्रिकी कंपन्यांनी देखील स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू केले आहे. कालांतराने या देशातून काडीपेटीची आयात देखील थांबविली जाईल, अशी भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानातील कंपन्या देखील भारतीय उत्पादकांना आव्हान देत असून त्यामुळेही भारतातील उद्योग अडचणीत सापडला आहे. जागतिक बाजाराचा विचार केल्यास भारत १ हजार काडीपेटी दहा प्रति डॉलरने दराने विक्री करतो तर पाकिस्तान मात्र ७ ते ८ डॉलर दराने विक्री करतो. भारतीय काडीपेटीचा दर्जा हा पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. तरीही पाकिस्तानने किंमत कमी ठेऊन भारताची बाजारपेठ हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या भारत जगभरात दरवर्षी अडीचशे कोटींहून अधिक काडीपेटींची निर्यात करतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Priya Bapatinflation
go to top