Financial Mangement संपत्ती वाटपाचा कायदेशीर मार्ग नका टाळू! नक्की करा आपल्या विम्याचे नाॅमिनेशन

विमा कायदा १९३८ (इन्शुरन्स ॲक्ट,१९३८) हा विमा क्षेत्र नियंत्रित करणारा मुख्य कायदा. या कायद्याच्या कलम ३९ मध्ये नॉमिनेशनविषयक Nomination सर्व तरतुदी नमूद केलेल्या आहेत. या कायद्यात कालानुरूप बदल, सुधारणा होत असतात. २०१५ मध्ये या विमा कायद्यात अनेक बदल करण्यात आले. त्यानुसार कलम ३९ मध्ये म्हणजेच नॉमिनेशनविषयक तरतुदीमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत
Financial Management विम्याच्या नाॅमिनेशनबाबत सबकुछ!
Financial Management विम्याच्या नाॅमिनेशनबाबत सबकुछ!Esakal

नॉमिनेशन म्हणजेच नामनिर्देशन म्हणजे काय? हे आपणा सर्वांना नक्कीच माहीत आहे. कारण बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, पोस्टाच्या विविध बचत योजना, विमा पॉलिसी अशा सर्वच ठिकाणी आपण नॉमिनेशन करत असतो. अर्थात, बरेचदा आपण याला एक औपचारिकता समजून हे नॉमिनेशन करत असतो.

मात्र, नॉमिनेशन नसल्यास, विमाधारकाचे Insurance Policy Holder किंवा ठेवीदाराचे निधन झाल्यानंतर हक्काचे पैसे मिळविण्यासाठी वेळखाऊ कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागते. याबाबी सुलभ करण्यासाठी नॉमिनेशन महत्त्वाचे ठरते. Financial Management why Insurance policy nomination necessary

आजकाल बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, शेअर अशा जिथे जिथे गुंतवणूक Investment केली आहे, तिथे सर्व ठिकाणी नॉमिनेशन Nomination करणे अत्यावश्‍यक असल्याचे सांगितले जाते. अर्ज भरतानाच हा रकानाही भरून घेतला जातो. अनेकदा नॉमिनेशन करत असताना आपण ते औपचारिकरित्या करतो. फारसे गंभीरपणे घेत नाही, कारण त्यावेळी त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com