Taxation लग्नसोहळ्यावर मोठा खर्च करण्यापूर्वी हे नक्की वाचा
Taxation लग्नसोहळ्यावर मोठा खर्च करण्यापूर्वी हे नक्की वाचाEsakal

Taxation लग्नसोहळ्यावर मोठा खर्च करण्यापूर्वी हे नक्की वाचा....

लग्न, घराचे नूतनीकरण, घरबांधणीचा खर्च, वास्तुविशारदाची फी यावर रु. ५० लाखांपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. येथे प्राप्तिकर कायद्यानुसार Income Tax Act टीडीएस आणि वस्तू व सेवाकर कायद्याखाली खाली सेवाकर पण लागू होतो, हे लक्षात असावे

ॲड. प्रतिभा देवी

pratibhasdevi@gmail.com

हल्ली मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ आयोजित केले जातात. ३ ते ४ दिवस समारंभ केले जातात आणि मग प्रत्यक्ष लग्न आणि स्वागत समारंभ साजरा केला जातो; तसेच आजकाल विवाहासाठी एखादे रिसॉर्ट बुक केले जाते आणि त्या कंपनीला पूर्ण रक्कम दिली, की ते सजावट, भटजी, बँड यापासून नाष्टा, जेवण सारी व्यवस्था करतात. या खर्चावर प्राप्तिकर कायद्यानुसार Income Tax Act टीडीएस कसा लागू होतो ते आपण पाहू या. Know the provision of tax Before arranging Grand Marriage Function

प्राप्तिकर कायदा १९६१ अन्वये उत्पन्नाच्या स्रोतातूनच Income Source जेव्हा कर कापला जातो, तेव्हा त्याला ‘टीडीएस’ असे म्हणतात. म्हणजे उत्पन्न जिथून मिळणार आहे, तिथेच हा कर एकूण उत्पन्नाच्या रकमेतून कापला जातो आणि उत्पन्नाची उरलेली रक्कम हातात मिळते. हा कापला गेलेला कर सरळ सरकार दरबारी जमा होतो. ज्याचा ‘टीडीएस’ TDS झालेला आहे, त्याला २६ एएस खाली क्रेडिट Credit मिळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com