Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणते शेअर ठरतील लक्षवेधक?

Lok Sabha 2024 Indian Stock Market: नववर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत शेअर बाजारात चढ-उतार अनुभवायला आले आहेत. यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्याने शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या शेअर बाजारात कोणत्या शेअरकडे लक्ष ठेवले पाहिजे.
Lok Sabha election 2024 experts recommend these 10 stocks to buy for long-term
Lok Sabha election 2024 experts recommend these 10 stocks to buy for long-term Sakal

सिद्धार्थ खेमका:

Lok Sabha 2024 Indian Stock Market: नववर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत शेअर बाजारात चढ-उतार अनुभवायला आले आहेत. यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्याने शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या शेअर बाजारात कोणत्या शेअरकडे लक्ष ठेवले पाहिजे, कोणते शेअर लक्षवेधक ठरू शकतात, यावर एक नजर... (उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी ः एक वर्ष)

सीमेन्स (उद्दिष्ट : रु. ४९५०) :

वहन आणि एचव्हीडीसी-संबंधित खर्चात पुढील काही वर्षांत सीमेन्स कंपनीचा थेट सहभाग राहणार आहे. रेल्वे-संबंधित संधी मिळवण्यासही ही कंपनी सुसज्ज आहे. सरकारकडून पायाभूत सुविधा (रेल्वे, रस्ते व ऊर्जा) क्षेत्रावर आणि खासगी कंपन्यांकडून विविध क्षेत्रांवर (औषध उत्पादन, डाटा सेंटर, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, धातू, अंतर्वाहतूक, रसायने, पाणी व सिमेंट) करण्यात येणाऱ्या उच्च खर्चातून निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधींबाबत ही कंपनी आशावादी आहे.

कोल इंडिया (उद्दिष्ट : रु. ४९०) :

कोल इंडिया आपले ८९ टक्के कोळसा उत्पादन वीज क्षेत्राला पुरवते आणि भारतातील एकूण वीज उत्पादनात औष्णिक विजेचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे. वीज क्षेत्रातील कोळशाची वाढती गरज भागवण्यासाठी कंपनीने एफएसए करार व बीएलसीच्या माध्यमातून दीर्घकालीन कटिबद्धता दाखवून दिली आहे.

अर्थवर्ष २४ मध्ये कंपनी ७८० दशलक्ष टन उत्पादन क्षमता गाठण्याच्या मार्गावर असून, एकूण उलाढालीच्या १५ टक्के पुरवठा ई-ऑक्शनद्वारे केला जात आहे.

ऊर्जा मंत्रालयाने अर्थवर्ष २४ साठी १७५० अब्ज युनिट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यात औष्णिक विजेचा हिस्सा ७५ टक्क्यांहून अधिक अपेक्षित आहे. ही स्थिती कोल इंडिया कंपनीला पुढील काही वर्षांत भक्कम कोळसा उत्पादन करण्यासाठी अनुकूल आहे.

एलआयसी (उद्दिष्ट : रु. १२७०) :

एलआयसीकडे विमा उद्योगातील आघाडीचे स्थान टिकवण्याची व उच्च नफाक्षम उत्पादनांच्या श्रेणीत व्यवसायवृद्धीला चालना देण्याची अनेक तंत्रे आहेत. अशा महाकाय संघटनेला विकासाचा वेग वाढवण्यासाठी उत्कृष्ट व सुनियोजित अंमलबजावणी योजनेची गरज असते.

अर्थवर्ष २३-२४ मध्ये एलआयसीचा एपीईमधील चक्रवाढ वार्षिक विकास दर ६ टक्के व व्हीएनबी चक्रवाढ वार्षिक विकास दर १२ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

अर्थात खासगी विमा कंपन्यांच्या तुलनेत एलआयसीचे नफ्याचे कमी प्रमाण लक्षात घेता, अर्थवर्ष २६ मध्ये तिचा कामकाजी आरओइव्ही (रिटर्न ऑन एम्बेडेड व्हॅल्यू) १०.७ टक्के राहील, असा अंदाज आहे.

झोमॅटो (उद्दिष्ट : रु. १७०) :

भारतात खाद्य वितरण व्यवसाय हा अद्यापही बाल्यावस्थेत असल्याने त्याला विकासासाठी मोठा पल्ला उपलब्ध आहे. झोमॅटो कंपनीकडे या बाजारपेठेतील आघाडीचा हिस्सा व भक्कम विकासक्षमता असल्याने अर्थवर्ष २४-२६ काळात तिचा समायोजित महसुलाचा चक्रवाढ वार्षिक विकास दर ३८ टक्के इतका भक्कम राहण्याची अपेक्षा आहे.

तिसऱ्या तिमाहीत नफाक्षमतेत सुधारणा झाल्यानंतर आता अर्थवर्ष २५ अखेर/अर्थवर्ष २६ अखेर या काळात तिच्या कर, व्याज, घसारा व कर्जमाफीपूर्व उत्पन्नाचा चक्रवाढ वार्षिक विकास दर अनुक्रमे ४.५ टक्के व १० टक्के राहण्याचा अंदाज आहे.

मारुती सुझुकी (उद्दिष्ट : रु. ११८५०) :

स्थानिक प्रवासी वाहनांच्या विक्रीतील स्थिर वाढ, नव्या सादर केलेल्या एसयूव्हीचे यश व सीएनजी वाहनांचा वाढता प्रसार यामुळे मारुती सुझुकी इंडिया लि. या कंपनीला स्पर्धकांच्या तुलनेत अर्थवर्ष २५ मध्ये उत्तम उलाढाल वाढ मिळविण्याची संधी आहे. पुरवठ्यातील सुधारणा, सुदृढ उत्पादन संग्रह व कामकाजी संधी यांमुळे कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा व नफ्याचे प्रमाण यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

व्हीबीएल (उद्दिष्ट : रु. १५००) :

कंपनीची उत्पादन क्षमता २०० टक्क्यांनी वाढल्याने व्यवस्थापनाला गॅटोरेड, ज्यूस व मूल्यवर्धित दुग्धोत्पादनांमध्ये भक्कम वाढीची अपेक्षा आहे. नव्या प्रदेशांमध्ये प्रसार, क्षमता व वितरणातील विस्तार, नव्या उत्पादनाला ग्राहकांची उच्च पसंती, ग्रामीण व निमशहरी भागांतील वाढत्या शीतकरण सुविधा व आंतरराष्ट्रीय उलाढालीत वाढ या घटकांमुळे कॅलेंडर वर्ष २३-२५ मध्ये कंपनीचा उत्पन्नाचा चक्रवाढ वार्षिक विकास दर २९ टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

Lok Sabha election 2024 experts recommend these 10 stocks to buy for long-term
Digital Payment: डिजिटल पेमेंट विकसित भारताच्या दिशेने स्मार्ट पाऊल; डिजिटल वॉलेट कसे काम करते?

बँक ऑफ बडोदा (उद्दिष्ट : रू. २९०) :

रीटेल कर्जवितरणातील वाढीमुळे बँक ऑफ बडोदा वाढत्या विकास संधींचा लाभ उठवण्यासाठी सज्ज आहे. कंपनी कर्जांची वसुली सुदृढ झाल्याने कर्जवितरण वाढ भक्कम झाली आहे. कर्जांचा दर्जाही सुधारला असून, निव्वळ थकित कर्जांचे प्रमाण ०.७ टक्के आहे. अर्थवर्ष २५ अखेर बँकेचा मालमत्तेवरील परतावा/शेअरवरील परतावा अनुक्रमे १.२ टक्के व १७.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

गेल (उद्दिष्ट : रु. २००) :

गेल कंपनीला देशातून भक्कम वायू मागणी मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थवर्ष २४ अखेरीपर्यंत कंपनीची वायूवहन उलाढाल प्रतिदिन १२४ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढण्याचा, तर अर्थवर्ष २५-२६ साठी उलाढालीतील वार्षिक वाढ १० ते १२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

शेअरवरील परतावा अर्थवर्ष २३ मधील ९.५ टक्क्यांवरुन अर्थवर्ष २६ मध्ये साधारणतः १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची; तसेच एफसीएफ उत्पन्नात अर्थवर्ष २३ मधील ४५.३ अब्ज रुपयांवरुन अर्थवर्ष २६ मध्ये ४९.४ अब्ज रुपयांपर्यंत सुदृढ वाढीची अपेक्षा आहे. या शेअरच्या फेरमूल्यांकनाला चालना मिळू शकते.

अपोलो हॉस्पिटल (उद्दिष्ट : रु. ७४००) :

या कंपनीला अर्थवर्ष २४ मध्ये आरोग्यसुरक्षा सेवा क्षेत्रातील महसुलात वार्षिक आधारावर १४ टक्के वाढ मिळवण्याची खात्री आहे. अर्थवर्ष २५ मध्ये हीच वाढ १५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. हेल्थ-को सेवेने अर्थवर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीत ब्रेक इव्हन (ना नफा-ना तोटा) पातळी गाठली असून, अपोलो २४/७ सेवाही सहा ते आठ तिमाहींमध्ये ही पातळी गाठण्याची अपेक्षा आहे.

Lok Sabha election 2024 experts recommend these 10 stocks to buy for long-term
Tax Saving Tips: जुनी करप्रणाली निवडली आहे? कर वाचवायचा असल्यास कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक कराल?

एचपीसीएल (उद्दिष्ट : रु. ५३०) :

तेल उत्पादक कंपन्यांत एचपीसीएलला विपणनात सर्वाधिक लाभसंधी आहेत कारण कंपनीच्या विपणन नफाप्रमाणात वाढ झाली आहे. अर्थवर्ष २५-२६ अखेर हे प्रमाण प्रतिलिटर ३.३ रुपये राहण्याचा अंदाज आहे.

एमएस/एचएसडी विपणन नफाप्रमाण सध्या अनुक्रमे प्रतिलिटर ११ रुपये व ८.६ रुपये आहे. अर्थवर्ष २६ अखेर शेअरवरील परतावा २०.६ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. वंगण व्यवसायातील डीमर्जरमुळे कंपनीला मूल्य-विमुक्ती संधी मिळण्याचीही मिळेल.

(लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.च्या रिटेल रिसर्च, ब्रोकिंग अँड डिस्ट्रिब्युशन विभागाचे प्रमुख आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com