घटस्फोट होऊनही नात्यांचा ओलावा जपत आमिरच्या कुटुंबीयांनी जिंकली सर्वांचीच मने!

एकाच समाजात एकाच वेळेला दिसणारा हा विरोधाभास आपण पुढच्या पिढीसाठी कोणता समाज पुढे घेऊन जाऊ इच्छितो हा प्रश्न निर्माण करतो आहे.
aamir khan vs suchana seth
aamir khan vs suchana sethesakal

मुंबई: आपल्या मुलाने आपल्या नवऱ्याला भेटू नये या भावनेतून नवऱ्याविषयी असणाऱ्या अपार द्वेषातून एकीकडे उच्चशिक्षित सूचना सेठ (latest marathi news of Suchana Seth)ही आई आपल्या चार वर्षाच्या चिमुरड्याचा जीव घेते (Goa Murder case)... तिथेच दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलीचं म्हणजेच आयरा खानचं लग्न (Ira khan wedding) सुरू असतं.. या लग्नात मात्र आमिर, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता (Reena datta), त्याचा मोठा मुलगा जूनैद तसेच दुसरी पत्नी किरण राव (Kiran rao), दुसरा मुलगा आझाद असे सगळे एकत्र आलेले पाहायला मिळतात. एवढेच नाही तर त्यांनी सुरू केलेल्या पाणी फाउंडेशनच्या महत्वाच्या पदांवर देखील हे तिघे असून एकत्रितपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

एकाच समाजात एकाच वेळेला दिसणारा हा विरोधाभास आपण पुढच्या पिढीसाठी कोणता समाज पुढे घेऊन जाऊ इच्छितो हा प्रश्न निर्माण करतो आहे.

(latest marathi news of Aamir Khan and Suchana seth)

भारतात घटस्फोट, आत्महत्या आणि घरगुती हिंसाचार

भारतात दरवर्षी दर हजार जोडप्यांमध्ये १३ जोडपी घटस्फोट घेतात. जगाच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे. पण घरगुती हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. तसेच भारतात २०२१ सालच्या आकडेवारीनुसार १ लाख ६४ हजार ३३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक जोडप्यांमध्ये मुलांच्या कस्टडीवरून, पोटगीवरूनचे वाद वर्षानुवर्षे सुरू आहेत.

मुलाच्या कस्टडीवरून महिला ट्रोल

सूचना सेठ यांनी मुलाची हत्या केल्यानंतर अनेक पुरुषांनी सुचना किंवा एकूणच महिला वर्गाला ट्रोल करत घटस्फोट प्रकरणात मुलांची कस्टडी आईकडे देऊ नये आणि आईकडे कस्टडी देणे कसे घातक आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.. यातून समाजाचे आणखी एक टोक अनुभवायला मिळालं असं म्हणण्यास हरकत नाही.

भावनिक तोल सांभाळणे आवश्यक

संवेदनशीलतेच्या भावनेने या विषयात 'इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ' (institute for psycological health)या संस्थेत 'सिंगल पॅरेंट' / 'एकल पालक' ग्रुपच्या संवादिका पल्लवी म्हणतात, "मी स्वतः एक सिंगल पॅरेंट (Single parent) आहे. आम्ही दोघं वेगळे झालो त्यावेळी माझा मुलगा साडेचार वर्षांचा होता, पण त्याचा परिणाम आम्ही कधीही आमच्या मुलाच्या आयुष्यावर होऊ दिला नाही. आज अनेक वर्षानंतर देखील मुलगा त्याच्या वडिलांशी, आजी आजोबा यांच्याशी बोलतो, भेटतो. या गोष्टी बोलायला जितक्या सोप्या वाटतात तेवढ्या सोप्या नसतात. अनेकांकडून नाते पूर्णपणे तोडण्याचा सल्ला दिला जातो. चुकीचे सांगण्याचा प्रयत्न केला जातो पण अशा वेळी मात्र आपण आपला भावनिक तोल सांभाळून या गोष्टी हाताळणे गरजेचे असते. आपल्या पाल्यासह प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र व्यक्ती, स्वतंत्र मत म्हणून स्थान देणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याच्या भावनिक गरजेचे भान पालकांनी बाळगायला हवे."

मुलांची कस्टडी देताना सायकॉलॉजीकल टेस्ट हवी

"मुलांच्या कस्टडीबद्दल मला असं वाटतं की, मुलांची कस्टडी ठरवत असताना पालकांची 'सायकॉलॉजीकल टेस्ट ' (psychological Test ) करुन घेणं अधिक चांगलं. पालक म्हणून तुम्ही त्या मुलाला सांभाळायला आर्थिक व शारिरीक सक्षमतेसह भावनिक आणि वैचारिक पातळीवर देखिल सक्षम असाल तरच ती कस्टडी त्या पालकांकडे द्यायला हवी."

(Custody Of child in divorce case)

aamir khan vs suchana seth
Suchana Seth Case : दोन तास पतीला ताटकळत ठेवलं, मुलाचा खूनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सूचना सेठबाबत नवीन माहिती

'हेल्दी' नाती ठेवण्यासाठी...

पल्लवी या मानसशास्त्र या विषयात पदवी घेत आहेत. त्या म्हणतात, "आमच्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. पण त्यांना समुपदेशन करताना पालकांना हेल्दी (healthy) नाती ठेवण्यासाठी आम्ही मदत करतो. आमच्या संस्थेत विचार, वर्तणूक आणि भावना यांचा त्रिकोण साधण्यासाठी मदत केली जाते."

लेखक सुनील तांबे म्हणतात...

लेखक सुनील तांबे यांनी आमिर आणि किरण राव यांचा घटस्फोट जाहीर झाल्यानंतर एक फेसबुक पोस्ट केली होती. ते म्हणाले, आमिर खान आणि किरण राव विभक्त झाले. बिल गेटस् आणि मेलिंडाही विभक्त झाले. असंख्य जोडपी विभक्त होतात. परंतु आमीर-किरण, बिल-मेलिंडा यांच्यासारखी जोडपी भारतीय संस्कृतीत दुर्मिळ आहेत. शोषण, अन्याय, अत्याचार, जुलूम, विश्वासघात यामुळे ही जोडपी विभक्त झालेली नाहीत. एक व्यक्ती, एक मूल्य या सूत्रानुसार ही जोडपी विभक्त झाली आहेत. भारतीय समाजात असं घडतंय ही बाब आश्वासक आहे.

माणसाचं निसर्गावर नियंत्रण वाढत गेलं त्या प्रमाणात विवाहसंस्थेला तडे गेले. कारण व्यक्ती समाजाच्या दडपणातून मुक्त होत गेली. तंत्रज्ञानाने, अर्थव्यवस्थेने हे बळ व्यक्तीला दिलं. जन्मभर एकत्र राहाणं वा नव्या जोडीदाराचा शोध घेणं वा एकल जगण्याचा मार्ग अवलंबणं हा निर्णय व्यक्तीचा असायला हवा. समाजाचा नव्हे. त्यातून नवी कुटुंबव्यवस्था आकाराला येईल. यायला हवी.

मुक्त आणि समान व्यक्तींचा समूह म्हणजे समाज अशी समाजाची व्यक्तीकेंद्रीत नवी व्याख्या विसाव्या शतकातच आकाराला येत होती. तिचे पडसाद आता भारतातही उमटत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे.

------

aamir khan vs suchana seth
Bengaluru CEO Suchana Seth: एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com