'वर्क फ्रॉम ऑफिस' मुळे कंपन्यांना खरंच फायदा होतो का? पहा, संशोधन काय सांगते

'वर्क फ्रॉम होम' तो 'वर्क फ्रॉम ऑफिस' पर्यंतचा कंपन्यांचा मागील चार वर्षांचा प्रवास अजूनही सोपा झालेला नाही.
WFH vs WFO
WFH vs WFOesakal

मुंबई: अमेरिकेतील एका कंपनीने 'वर्क फ्रॉम ऑफिस' साठी थेट आदेश न देता कर्मचाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये गाणी लावत त्यावर अधिकाऱ्यांचे डान्स केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे..

"तंत्रज्ञान तुमचे मित्र नसून आम्ही तुमचे मित्र आहोत, आमच्याकडे या आमच्याशी बोला" असेही कंपनीकडून सांगण्यात येते आहे..

एकीकडे चार वर्षाच्या संघर्षानंतर देखील कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये घेऊन येण्याचे प्रयत्न सुरु आहे तर दुसरीकडे संशोधनातून वेगळीच माहिती समोर आली आहे..

'वर्क फ्रॉम होम' तो 'वर्क फ्रॉम ऑफिस' पर्यंतचा कंपन्यांचा मागील चार वर्षांचा प्रवास अजूनही सोपा झालेला नाही.

वर्क फ्रॉम ऑफिसमुळे कंपन्यांची उत्पादकता वाढते असा समज असला तरीही अमेरिकेतील एका संशोधनातून असे समोर आले आहे की वर्क फ्रॉम ऑफिसच्या आदेशांनंतर देखील कंपनीची कोणतीही आर्थिक वाढ झालेली नाही, उलट वर्क फ्रॉम ऑफिसची सक्ती कर्मचाऱ्यांमध्ये नकारात्मक वातावरण पसरवते आहे.

(Latest Marathi news about IT sector)

अमेरिकेच्या पिट्सबर्ग विद्यापीठातील 'कॅट्झ ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस' ने याबाबत एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे आहे.

या अभ्यासानुसार 'वर्क फ्रॉम ऑफिस' सुरु करावे असे आदेश कंपन्यांच्या आर्थिकतेत फारसा फरक पडू शकले नसल्याचे समोर आले आहे. यासाठी स्टॅंडर्ड आणि पुअर अशा नमुन्यांमधील ५०० कंपन्यांच्या डेटाचा अभ्यास केला आहे.

यामध्ये त्यांनी त्रैमासिक निकालातील सरासरी बदल तपासले आहेत तसेच कंपन्यांची शेअरची किंमत, कंपन्यांनी दिलेले आदेश अशा सर्व गोष्टींचे विश्लेषण या अभ्यासात करण्यात आले आहे. यामध्ये २०१९ ते २०२३ दरम्यानच्या ४५७ कंपन्यांच्या ४ हजार ४५५ त्रैमासिक अहवालांचा समावेश आहे.

भारतातील टॉप आयटी कंपन्यांनी अद्यापही पूर्णपणे ऑफिस किंवा पूर्णपणे घरून काम असे पर्याय स्वीकारलेले नाहीत. मात्र आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला येण्याची सक्ती मात्र काही कंपन्यांनी केलेली आहे.

एका एच.आर कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार भारतातील १० आयटी कंपन्यांपैकी ६ कंपन्यांनी हायब्रीड मोड ठेवला आहे.

(work from home or work from office, what research say..?)

WFH vs WFO
TCS ने पाठवली 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोटीस, कर्मचाऱ्यांची थेट सरकारकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

प्रतिभा टारे म्हणाल्या, माझी कंपनी कल्याणी नगरला होती. घरापासून हे अंतर २५ किलोमीटर होते. जॉईन होतानाच कंपनीने मला वर्क फ्रॉम होम असणार आहे असे सांगितले होते.

पण महिन्याभरातच पॉलिसी बदलली आणि वर्क फ्रॉम ऑफिस चे आदेश आले. त्यामुळेच मी ती कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.

इन्फोसिसमध्ये काम करणारे गजानन म्हणाले,'वर्क फ्रॉम ऑफिस' मध्ये काम करणाऱ्यासाठी कोणतीही सक्ती केली जात नाही.

बऱ्याचदा तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवर काम करता यावर ते अवलंबून असते. काही कंपन्यांनी ऑफिसमधूनच काम करावे असे आदेश दिले आहे.

काही कर्मचाऱ्यांना आपल्याला ऑफिसमध्ये बोलायला जात नाही म्हणजे आपण काढले जाणार की काय? अशी भीती देखील आहे.

भारतातील आयटी क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर आहे, हे उत्पादन क्षेत्र नाही. आपण ज्या काळात आहोत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक नोकऱ्यांना पर्याय ठरू शकते.

रोज नवीन आव्हाने आहेत. ही सगळी आव्हाने तेव्हाच पेलता येतील जेव्हा माझ्या आजूबाजूला काय घडतंय याची मला माहिती होईल, नवीन आयडिया, इनोव्हेशन वर चर्चा होईल.

तर दुसरीकडे असे आव्हान आहे की, वाहतूक कोंडीत कर्मचाऱ्यांचे २-२ तास जात आहे, फ्लेक्सिबल वेळापत्रक पाळता येत नाहीये. घरी बसून फक्त आपले काम आणि आपण इतकंच वर्तुळ मर्यादित राहतं आहे. त्यामुळे कोणत्याच एका मोडवर शंभर टक्के अवलंबून राहणे भारतासाठी योग्य नाही.

याला हायब्रीड मोड हा पर्याय सर्वात चांगला आहे. कंपनीची उत्पादकता, कर्मचारी उत्पादकता, टीम बिल्डिंग, कर्मचाऱ्यांची आरोग्य, मानसिक आरोग्य या सगळ्याच गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.

(work from office improves a productivity?)

WFH vs WFO
Flipkart मध्ये Work From Home करणाऱ्यांसाठी मोठी संधी, जाणून घ्या

याविषयी 'आयरिन टेक सर्व्हिसेस' या रिक्रुटर कंपनीतमध्ये काम करणाऱ्या चैत्राली कुलकर्णी-चोरघे म्हणाल्या, आम्ही जेव्हा कंपन्यांसाठी भरती करतो तेव्हा अनेक कंपन्यांचा आग्रह हा वर्क फ्रॉम ऑफिससाठी असतो.

तर अनेक कर्मचारी नोकरी निवडताना वर्क फ्रॉम होम असेल तरच नोकरी स्वीकारतात. खासकरून महिला आणि ज्यांची लहान मुले असतात त्यांना हे पर्याय दिले जातात.

सरसकट सर्वांना आदेश देण्यापेक्षा कामाचे स्वरूप आणि कर्मचाऱ्यांची परिस्थिती अशा दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो.

तर हिंजवडी येथील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या रिमा भट्टड म्हणाल्या, माझा मुलगा लहान आहे, त्याला आईकडे सोडून मग जेव्हा मला हिंजवडीला पोहोचायचे असते त्यात माझा दीड तास जातो, म्हणजे रोजचे तीन तास जातात.

त्यामुळेच मी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे. पुण्यात जिथे जिथे आयटी सेक्टर आहे तिथल्या ट्रॅफिकची स्थिती खराब आहे .

त्यामुळे पुण्यातल्या आयटी सेक्टरमध्ये सध्या साधारण हायब्रीड पद्धत सुरु आहे ज्यात दोन दिवस कामावर जावे लागते बाकी दिवस घरून काम असते.

(pune's traffic effect on IT sector)

(work life balance in IT sector)

WFH vs WFO
Work From Home : ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढले कामाचे समाधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com