धाव क्रीडासंस्कृतीच्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sport}

धाव क्रीडासंस्कृतीच्या दिशेने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महेंद्र गोखले

खेळ आणि तंदुरुस्तीबाबत देशात अनेक सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. क्रीडा मंत्रालय, खेळ क्रीडा प्राधिकरण आणि अनेक खासगी संस्था देशात ‘खेळ आणि फिटनेस संस्कृती’ रुजवण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहेत. त्या संदर्भात काही विचार.

भारत देशाला अनेक आंतरराष्ट्रीय पातळीच्या क्रीडा स्पर्धा जसे ऑलिम्पिक किंवा इतर स्पर्धा, यात हवे तसे यश मिळत नाही अशी टीका आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळते. खरं तर ह्या परिस्थितीला केवळ ते खेळाडू जबाबदार असतात, असे नाही. त्यांच्या अपयशाला त्यांची आणि देशातली पार्श्वभूमीही तितकीच जबाबदार आहे. अजूनही फिटनेस किंवा व्यायाम हा आपल्या देशातील लोकांच्या जीवनशैलीचा भाग नाही. भविष्यात उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी अनुकूल वातावरण, प्रोत्साहन व सुविधा यांचा अभाव आहे. ही परिस्थिती बदलायला हवी.

हेही वाचा: जागतिक वारसास्थळांच्या यादीत भारत आता ‘सुपर-४० क्लब’मध्ये सामील

त्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतील. १) किफायतशीर सुविधा : खेळ आणि फिटनेस’ अतिशय माफक दरात आणि सहज उपलब्ध असतील अशी यंत्रणा विकसित व्हावी. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन. २) फिटनेस संस्कृतीचा प्रसार : गेल्या दोन ते तीन वर्षात शाळांमधून अनेक राष्ट्रीय पातळीच्या कार्यक्रमांतून फिटनेस संस्कृती वाढीस लागली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम येत्या पाच वर्षांत दिसेल. ती संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी सरकारबरोबरच खासगी संस्थांचीही आहे. लोकांना प्रेरित करण्यासाठी किंवा त्याचा उत्साह वाढविण्यासाठी आपण धावणे, सायकल चालवणे, चालणे अशा क्रीडा प्रकारांचे आयोजन करू शकतो. अशा कृतींमधून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढणे यासारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवता येते. सुमारे २०३० पर्यंत प्रत्येक तीन व्यक्तींनंतर एक व्यक्ती लठ्ठ असणार आहे, असा अंदाज वर्तवला जातो.

३) शाळांमधील उपक्रम : प्रत्येक मुलाला रोज किमान एक खेळ ४५ मिनिटांसाठी खेळायला प्रोत्साहित करायला हवे. मुलांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडतील. निरोगी पिढी निर्माण होणे यासारखी गुंतवणूक नाही. तो अभ्यासक्रमाचा एक भाग व्हावा. प्रत्येक शाळेत खेळाच्या सुविधा आणि त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे सुनियोजित आणि रचनात्मक गट करायला हवेत. बऱ्याच शाळांमध्ये मोकळे मैदान असते. कमीत कमी बास्केटबॉलचे मैदान तरी असतेच. त्यांच्या आठवड्याच्या वेळापत्रकात काही तास खेळासाठी दिलेले असतातच. पुढील पंचवार्षिक योजनेमध्ये शाळेमध्ये खेळाला योग्य प्राधान्य देण्यावर भर दिला जाईल; ज्यायोगे लहान वयात मुलांची आवड आणि क्षमता लक्षात घेता येईल. शारीरिक शिक्षण किंवा खेळ हा विषय पाच अत्यावश्यक विषयांमध्ये गणला जावा. मुलांतील सुप्त गुणांवर काम करायला हवे.

हेही वाचा: पर्यावरणासाठी जगतवारी करणारा 'सायकलबाबा' आहे तरी कोण?

‘खेलो इंडिया’चे यश

नुकतेच आपण ‘खेलो इंडिया’ ला मिळालेले यश पाहिले आहे. देशातील सर्व शाळांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले.हे खेळ टीव्हीवर बघून मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. खेळांसाठीच्या चॅनलची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या जाहिरातीसाठी त्यात गुंतवणूक करतात. गुंतवणुकदारांना त्यांची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते हे लक्षात येते, तेव्हा तेही यात गुंतवणूक करायला तयार होतात. त्याने अप्रत्यक्षरीत्या खेळाला प्रोत्साहन मिळते. याचे कारण त्यांच्या कंपनीचे नाव एखाद्या खेळाबरोबर जोडले जाणे जास्त महत्वाचे वाटते. सध्याच्या पायाभूत सुविधांत व सोयींमध्ये सुधारणा व्हावी. भारताबाहेर अनेक क्रीडासंस्था किंवा क्लब आहेत; ज्यांना भारतात क्रीडा क्षेत्राl गुंतववणुकीची इच्छा आहे. त्यांना एखादा खेळ लोकप्रिय करून त्याचे टेलिव्हिजन वरून थेट प्रक्षेपण दाखवण्याची इच्छा आहे. ह्या सगळ्या संस्था तंत्रज्ञ, आवश्यक सुविधा आणि काही तरुण आणि होतकरू खेळाडूंना शिष्यवृत्ती देऊन त्याच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्याची तयारी दाखवतात. या सर्व उपक्रमाद्वारे आपल्या देशातील खेळाचा दर्जा वाढावा यासाठी प्रयत्नशील असतात. अशा संस्थांचा उद्देश्य खेळाची लोकप्रियता वाढवणे, त्यायोगे खेळासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांच्या नावाच्या ब्रँडने विकणे आणि त्याचे नाव त्या देशात प्रस्थापित करणे हाच असतो. अशा प्रकारच्या सहयोगामुळे खेळाची प्रगती आणि आपल्या देशातील खेळाडूंना मिळणाऱ्या उत्तम संधी आहेत, ह्या दृष्टीने बघितले तर युवकांत खेळाविषयी प्रेम निर्माण होईल.

हेही वाचा: S+ : हेडमास्तरांना ई-मेल

जर आपल्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा असेल तर खेळाबाबतची ही व्यावसायिकता आपल्या क्रीडा संस्थांनी अंगिकारली पाहिजे. सध्या आपल्या देशातील प्रचलित मानधनाच्या रिवाजातून बाहेर पडून वैश्विक दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे. प्रशिक्षक, मदतनीस, व्यवस्थापक ह्यांचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे. केवळ कुणाच्या तरी शिफारसीने व्यक्तींना ह्या संचात समाविष्ट करण्याचे दिवस नाहीत. आत्ता प्रत्येक व्यक्तीची नेमणूक त्याच्या गुणवत्तेनुसारच होते. अनेक नेमणूक झालेल्या व्यक्ती क्रीडा व्यवस्थापन किंवा क्रीडा शास्त्रासारख्या अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदविका संपादन केलेल्या असतात. अशा व्यावासायिकांनाच अशा प्रकारची जबाबदारी द्यायला हवी; ज्यायोगे खेळ आणि त्याच्या बरोबरीने येणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा राखायला आणि वाढवला हवा. कितीतरी युवकांसाठी हा करियरचा चांगला पर्यायही आहे. खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे; पण अशा स्पर्धा मध्ये, ज्यांचे आयोजन रचनाबद्ध असेल आणि ज्या स्पर्धांना दीर्घकाळ चालू राहण्याची शक्यता असेल. एक साधी, कधीतरी एकदाच होणारी स्पर्धा तशी निरुपयोगी असते असे नाही पण योग्य रचनाबद्ध स्पर्धेला दीर्घकाळ चालू राहण्याची शाश्वती असते. अशा स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या गुणवत्तेला चांगला वाव मिळतो. तसेच स्पर्धात्मक विचारांना आणि खेळात सुधारणा करण्याला चालना मिळते. खरतरं त्यांच्या समोर इतक्या संधी उपलब्ध होतात, की त्यातून नक्की कोणत्या मार्गाने जावे, याचा त्यांना निर्णय करावा लागतो.

हेही वाचा: वेडात मराठे वीर दौडले पाच

चमकत्या ताऱ्यांचा उपयोग

भारतामध्ये ‘खेळाडू-दैवत’ मानण्याची संस्कृती आहे. खेळाडूंना जनमानसात खूप आदराचे आणि मानाचे स्थान आहे. प्रत्येक खेळाची ओळख त्याच्या दर्जेदार खेळाडूंमुळे होते, ज्याला प्रसिद्धीच्या भाषेत ब्रँड अम्बेसेडर म्हणतात. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचे, लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा टेनिसचे, विश्वनाथन आनंद बुद्धिबळाचे, मेरी कॉम बॉक्सिंगची हे सर्व त्यांच्या त्यांच्या खेळाचे चमकते तारे आहेत. त्यांचा उपयोग खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी करता येईल.

(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक व फिटनेस ट्रेनर आहेत.)

go to top