अपूर्वा नेमळेकर मुलाखत
अपूर्वा नेमळेकर मुलाखतEsakal

चिक्की, पिशवी आणि 'ती' रात्र; अपूर्वाला भेटलेली दुर्गा

उत्सवासोबतच प्रत्येक ‘स्त्री’चा आदर, सन्मान आणि सक्षमीकरणाकडेही लक्ष दिले जात आहे. असाच विचारांचा जागर, भक्तीची अनुभूती आणि एक सामान्य स्त्री, कलाकार ते दुर्गा होण्यापर्यंतचा प्रवास अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडला आहे

उत्सवासोबतच प्रत्येक ‘स्त्री’चा आदर, सन्मान आणि सक्षमीकरणाकडेही लक्ष दिले जात आहे. असाच विचारांचा जागर, भक्तीची अनुभूती आणि एक सामान्य स्त्री, कलाकार ते दुर्गा होण्यापर्यंतचा प्रवास अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडला आहे.....

कोविडचे निर्बंध जाऊन यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरवात झाली आहे. सर्वत्र जगदंबेचा जागर सुरू आहे आणि याच सोबत सुरू आहे तो विचारांचा जागर. ज्या जगदंबेची आपण नऊ दिवस पूजा करतो ती नाना रूपाने आपल्या घराघरात वसते... (Marathi TV Actress Apoorva Nemlekar interview on Navaratri)

नवरात्रीशी खास नातं ..

आज विज्ञान युगात (Science Age) आपण कितीही पुढे गेलो तरी अध्यात्म, भक्ती, अनुभूती अशा गोष्टींचं महत्व नाकारून चालत नाही. त्या परमेश्वराचा अंश कुठेतरी आपल्याला प्रचिती देत असतो, असाच अनुभव अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरलाही आलेला आहे. नवरात्रीच्या अनुभवाविषयी ती म्हणते, ‘माझी जितकी श्रद्धा गणपती (Ganapati) वर आहे तितकीच देवीवर देखील आहे. मुळात मी प्रचंड धार्मिक आणि आध्यात्मिक आहे. माझी देवावर मनापासून श्रद्धा आहे. अगदी आताच नाही तर लहानपणापासून मला या सर्व गोष्टींचं वेड आहे. देवीचं रूप, तिचं दिसणं, तिचं तेज या सर्व गोष्टी मला खूप ऊर्जा देऊन जातात. शाळेत असतानाही परीक्षेच्या तोंडावर नवरात्री यायच्या पण मी त्यातूनही अभ्यासाचं नियोजन करून आमच्या मंडळाच्या देवीला जायचेच. वेगळं काहीतरी करून नटायचं, देवीला जायचं, गरबा खेळायचा, वेशभूषा स्पर्धेत भाग घ्यायचा, जिंकायचं याची मला खूप आवड होती. आईबाबा, माझी बहीण ते देखील मला सपोर्ट करायचे. आज कामामुळे हे चित्र काहीसं बदललं असलं तरी आजही उत्सवाविषयी तीच भावना आहे.’

तुम्ही देवीचा अवतार धारण केला तरी लोकांची विकृती बदलत नाही..

अपूर्वा दरवर्षी नवरात्रीत (Navaratri) काहीतरी विशेष करत असते. दोन वर्षांपूर्वी तिने समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या देवीसमानच आहेत ते दाखवणारा एक व्हिडीओ केला होता तर गेल्यावर्षी तिने स्वतः नऊ देवींची रुपं धारण करून फोटोशूट केले होते. तिच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि काहींकडून टीकाही झाली. या विषयी ती म्हणाली, ‘मला खूप लोक बोलतात की तुझ्या डोळ्यात एक वेगळीच ऊर्जा आहे, तू आम्हाला एखाद्या देवी सारखी दिसतेस, तू देवीची भूमिका का करत नाही. त्यामुळे कुठेतरी हे सर्व माझ्या मनात होतं. पण ते सत्यात उतरवण्यासाठी खरी मेहनत घेतली ती माझ्या मेकअप आर्टिस्टने. ही संकल्पना मी आणि माझी मेकअप आर्टिस्ट मनिषा कोलगे आम्ही मिळून ठरवली. यामध्ये आम्हाला कुठेही ‘व्हीएफएक्स’, ‘सेट’ याचा वापर करायचा नव्हता. त्यामुळे गाभाऱ्यातील देवी साकारण्यावर आम्ही भर दिला जेणेकरून मेकअप आणि हावभावाद्वारे आम्हाला ते लोकांपुढे आणता येईल. मग महाराष्ट्रातील नऊ देवी, त्यांची माहिती याचा अभ्यास करून आम्ही हे केलं आणि ते यशस्वी देखील झालं.’

पुढे ती म्हणाली, ‘बहुसंख्य लोकांनी या प्रयोगाचं खूप कौतुक केलं पण काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके विकृत लोकही होते. ज्यांनी खूप टीका केली. 'एकीकडे शेवंता सारखी बाई साकारणारी तू, देवीचं रूप घ्यायला लाज वाटते का.. तू स्वतःला इतकी ग्रेट समजू नकोस’ अशाही प्रतिक्रिया आल्या. पण मी त्याकडे फार लक्ष दिलं नाही, कारण अशा विकृती आपल्याकडे असतातच.’

अपूर्वा नेमळेकर मुलाखत
नवरात्रीच्या नऊ दिवसांत करा आर्थिक नियोजन....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com