

Public Trust Investment Rules
esakal
सार्वजनिक न्यासांनी शिल्लक रक्कम कुठे गुंतवावी, याबाबत महाराष्ट्र विश्वस्त कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या चाकोरीबद्ध नियमावलीतून सार्वजानिक न्यासांनी करावयाच्या गुंतवणुकीचे प्रकार कधीही फारसे बदलले गेले नाहीत. आता मात्र, त्यात स्वागतार्ह बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा न्यासांना कसा फायदा होणार आहे, याचा आढावा...
सार्वजनिक न्यासांनी मिळालेल्या उत्पन्नातून खर्च वजा जाता राहिलेली शिल्लक कोणत्या गुंतवणूक प्रकारात गुंतवून ठेवावी याबाबत महाराष्ट्र विश्वस्त कायद्यात केवळ निकषच नव्हे, तर स्पष्ट तरतुदी देण्यात आल्या आहेत. या तरतुदींचे पालन केले नाही, तर तो गंभीर गुन्हा मानला जातो. त्याचे दुहेरी परिणाम होऊ शकतात. पहिला म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई होते. दुसरा परिणाम म्हणजे प्राप्तिकर कायद्यांतर्गत झालेली गुंतवणूक हा उचित विनियोग मानला जात नाही. त्याप्रमाणे या विनियोगावर पूर्ण दराने प्राप्तिकर भरावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक न्यासाच्या विश्वस्तांना दोन्ही बाजूंनी फटका बसू शकतो.