Premium|Global Commodity Market : युद्ध, महागाई आणि रुपयातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोने‑चांदीसह कमोडिटी गुंतवणूक पुन्हा केंद्रस्थानी

Crude Oil Crisis : इराण-इस्राईल संघर्षाने जागतिक महागाईचा भडका उडाला असून, कच्च्या तेलाचे दर आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण यामुळे सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला कात्री लागण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम आता घरगुती खर्चावर होणार आहे.
Global Commodity Market

Global Commodity Market

esakal

Updated on

ऋषिकेश उगले - rushikesh.ugale@mcqube.in

आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत युद्ध, कच्च्या तेलाचे दर आणि चलनातील चढ-उतार यांचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होताना दिसत आहे. अशा वेळी सोने, चांदी आणि इतर कमोडिटी हा गुंतवणूक पर्याय म्हणून पुन्हा चर्चेत येत आहेत. वाढती महागाई, जागतिक अनिश्चितता आणि गुंतवणुकीच्या बदलत्या प्रवाहांच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटकांचा परस्परसंबंध समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याच मुद्द्यांचा वेध घेणारा हा लेख...

सध्या जग युद्धाच्या विळख्यात अडकलंय! इराण, इस्राईल आणि अमेरिकेच्या वादात संपूर्ण जग वाढत्या महागाईने होरपळून जाईल, याची भीती वेगाने पसरत आहे. युद्धाचा केंद्रबिंदू ठरलेलं ठिकाण म्हणजे होर्मूझची सामुद्रधुनी. जगातील २० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा या भौगोलिक क्षेत्रातून पाठवला जातो आणि इराणच्या सीमेला लागून असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्याचा थेट इशारा इराणकडून देण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ७५ डॉलर प्रति बॅरलवरून ११० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत उसळी घेताना सर्व जगाने पाहिले. भारताच्या दृष्टीने अजून एक डोकेदुखी म्हणजे मागील सहा महिन्यांत भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ८७ रुपये प्रति डॉलरपासून ९४ रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरला, ज्यामुळे आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत वाढत जाणार, ही आर्थिकदृष्ट्या खूप गंभीर बाब आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com