Premium|Oil Crisis India : भारतामध्ये तेलाच्या किमती इतक्या प्रचंड वेगाने का वाढतायेत? आतापर्यंतच्या तेलाच्या संकटांवर आपण कशाप्रकारे मात केली आहे?

Crude Oil Prices : तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई, रुपयाची घसरण, वाहतूक खर्च आणि व्यापार साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. भारत आता तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे
Crude Oil Prices

Crude Oil Prices

esakal 

Updated on

डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका हेकेखोर व्यक्तीमुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले आणि आज त्या युद्धाचे परिणाम सारे जग भोगत आहे. इराण या तुलनेने छोट्याशा देशाने साऱ्या जगाच्या राजकारणावर आणि अर्थकरणावर परिणाम केला आहे. एका अरुंद समुद्री मार्गामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास रोखला जाऊ शकतो, असा कोणत्याही सामान्य व्यक्तीने कधी विचारही केला नसेल पण सध्या नेमकं तेच घडत आहे. मध्य-पूर्वेतील होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावाने केवळ तेलाचे टँकर अडवले नाहीत, तर जगभरातील बाजारपेठा, चलनं, शेअर बाजार आणि सामान्य लोकांच्या खिशालाही हादरा दिला आहे. पेट्रोल पंपावर वाढलेल्या किमती फक्त सुरुवात असते. कारण तेल महागलं की त्याचा परिणाम भाजीपासून विमानप्रवासापर्यंत, खतांपासून रुपयाच्या किमतीपर्यंत आणि शेवटी तुमच्या रोजच्या जगण्यापर्यंत पोहोचतो.

भारतासाठी हे संकट आणखी गंभीर आहे. कारण आपण वापरत असलेल्या प्रत्येक १० लिटर तेलापैकी जवळपास ९ लिटर तेल परदेशातून येतं. आणि त्यातलं मोठं तेल याच एका समुद्री मार्गावर अवलंबून आहे. इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा जगात तेलसंकट निर्माण झालं, तेव्हा भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. कधी रॉकेलच्या रांगा, कधी सोनं गहाण ठेवण्याची वेळ, तर कधी संपूर्ण आर्थिक धोरण बदलण्याची गरज भासली होती

मग आता समोर उभं राहिलेलं संकट किती मोठं आहे? तेलाच्या किमती वाढल्या की नेमका कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा होतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत अजून किती काळ जगाच्या तेलराजकारणावर अवलंबून राहणार? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत सकाळ+च्या या लेखातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com