

Bihar Political Transition
esakal
डॉ. अविनाश कोल्हे, राज्यशास्त्राचे प्राध्यापक
नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव समाजवादी विचारसरणीचे, तर सुशील मोदी हिंदुत्ववादी. या तिघांतील समान धागा म्हणजे तिघेही ओबीसी समाजाचे नेते.
१९९० मध्ये जनता पक्षात असलेले लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि त्या राज्यात ओबीसींच्या वरचष्म्याचा काळ सुरू झाला, जो आजही कायम आहे. आता मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले सम्राट चौधरीसुद्धा ओबीसी समाजाचे आहेत.
भाजपचे बिहारमधील ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे चोवीसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी जाहीर केले की, बिहारचा कारभार ‘मोदी-नितीश’ मॉडेलनुसारच चालवला जाईल. अशा घोषणा तशा अपेक्षितच असतात. यातून असे दाखवायचे असते की, जरी एका पक्षाच्या हातातून दुसऱ्या पक्षाच्या हातात सत्ता गेली असली, तरी परंपरेशी, पूर्वसुरींच्या विचारांशी असलेले नाते तुटणार नाही. पण अशा घोषणांना काहीही अर्थ नसतो.