

Bajri Khichdi Recipe
esakal
वाढप
४ व्यक्तींसाठी
साहित्य
चार वाट्या बाजरीचे पीठ, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १ चमचा डाळिंबाचे दाणे.
कृती
प्रथम तूप पातळ करून बाजरीच्या पिठाला चोळून घ्यावे. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा घालावा. डाळिंबाचे दाणे कुटून घालावेत. चवीनुसार मीठ घालावे. पाणी घालून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यावे. पोळपाटावर तेलाचा हात लावून जाडसर धोडे लाटावेत. तव्यावर तेल घालून त्यावर धोडे गुलाबी रंग येईपर्यंत थालीपिठाप्रमाणे भाजावेत. तूप आणि दह्याबरोबर खावेत. गरम किंवा गार दोन्ही पद्धतीने छान लागतात.
टीप - हे धोडे बाजरीऐवजी ज्वारीचे पीठ वापरूनही करतात.