Premium|Cafe Culture and Human Connections : कॅफे ‘संस्कृती’ आणि बरंच काही...!

How Cafes Bridge Generations : कॅफे संस्कृती आता केवळ तरुणांपुरती मर्यादित राहिलेली नाही. मैत्री, प्रेम, संवाद आणि आठवणींचा उत्सव साजरा करणारी ही जागा आज सर्व पिढ्यांना एकत्र आणणारा आधुनिक दुवा ठरत आहे.
Cafe Culture and Human Connections

Cafe Culture and Human Connections

esakal

Updated on

प्रतीक जाधव

कॅफे म्हणजे फक्त तरुणांचा हँगआउट पॉइंट ही व्याख्या आता पुसट झाली आहे, कारण मध्यमवयीन, उतारवयीन लोकसुद्धा मोठ्या संख्येनं कॅफेजकडे वळू लागले आहेत. कॅफेमध्ये एक टेबल तरुणांचं, तर त्याच्याच शेजारी दुसरं टेबल प्रौढांचं असं चित्र सर्रास पाहायला मिळू लागलं आहे. ‘जनरेशन गॅप’ ही संकल्पनाच जणू त्या

दोन टेबलांच्या मधल्या निमुळत्या गॅपमध्ये येऊन अदृश्य झाली आहे.

फर्स्ट क्लास कॉफी... अशी ऑर्डर दिल्यानंतर वेटरने ती कॉफी टेबलवर आणून ठेवावी; गप्पांची चव घेण्यात तासन्‌तास गेल्यानं कॉफीची आठवण ती पूर्णपणे थंड झाल्यावरच यावी आणि मग त्या थंड कॉफीचा प्रत्येक घोट पिताना ती आणखीनच चवदार लागावी... अशा अनुभूतीचं ठिकाण म्हणजे कॅफे! एका कॉफीवर जगातलं प्रत्येक सुख साजरं करणारी जागा म्हणजे कॅफे! चिलआउट स्पेस, हँगआउट स्पेस असं तुम्ही काहीही म्हणा, पण तिथं वाफाळत्या घोटांसोबत रंगणाऱ्या गप्पा तुमचं भावविश्‍व फुलवतात. काहीच मिनिटांच्या आउटिंगसाठी आलेलो आपण अनेकदा धुंदपणे बोलत राहतो. म्हणजे बघा ना, जर मोबाईल संवाद कमी करणारं ‘बायोटिक’ असेल, तर कॅफे संवाद वाढवणारं ‘अँटिबायोटिक’ आहे असं मला वाटतं.

Cafe Culture and Human Connections
Vinod Sharma Painter : कलाकाराचे स्वातंत्र्य आणि सर्जनाची प्रक्रिया
Cafe Culture and Human Connections
Premium|Viral Rickshaw Video : भूमकर काका झाले 'सेलिब्रिटी'! एका व्हायरल व्हिडिओने रिक्षा नाक्यावर उडवून दिली खळबळ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com