

Personal Finance and Tax Planning
esakal
चैतन्य भागवत
कर भरताना अनेकदा ‘टॅक्स थोडा कमी झाला असता तर बरं झालं असतं’ असं वाटतं. वर्षभर मेहनत करून कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवल्यास भविष्य सुरक्षित होतेच, पण त्याचबरोबर करबचतही करता येते. परंतु, यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची माहिती असणे गरजेचे आहे. अशाच काही गुंतवणुकीच्या आणि वजावटीच्या पर्यायांवर एक नजर टाकू या...
आपण आपल्या कमाईतला बराचसा भाग कर म्हणून सरकारकडे जमा करतो. पण अनेकांना कर कसा वाचवता येईल, याबद्दल पुरेशी माहिती नसते आणि त्यामुळे कमाईतली बरीचशी रक्कम कर स्वरूपात दिली जाते. खालील काही गोष्टींचा अभ्यास करून आपण आपले पैसे गुंतवले, तर आपला कर वाचू शकतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास केवळ करबचतच होत नाही, तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेलाही आधार मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने वेळेत आणि योग्य माहिती घेऊन कर नियोजन करणे गरजेचे आहे.
प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे सरकारकडे कर भरत असतो, मग तो प्राप्तिकर असो किंवा जीएसटी. त्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. डायरेक्ट टॅक्स आपल्या उत्पन्नामधून दिला जातो आणि जीएसटी हा आपण खरेदी करतो त्या वस्तू आणि सेवांवर आकारला जातो. प्राप्तिकर बचतीसाठी हे काही पर्याय...