Good Parenting : दहा वर्षांपर्यंतचा काळ मुलांच्या जडणघडणीतला सर्वात महत्त्वाचा काळ

शिक्षण माणूस घडवणारे असावे असे स्वामी विवेकानंद म्हणत असत..
Good Parenting
Good Parentingesakal

आजच्या धावपळीच्या जगातली पहिली ते दहावी या शालेय वयातल्या आपल्या मुलांना आपण छोट्या-छोट्या भासणाऱ्या मार्गांनी खूप मदत करू शकतो आणि मुलांबरोबरचे आपले बंध अधिक अर्थपूर्ण करू शकतो. या दिशेने जाताना यातले काही संकल्प आपल्या मुलाच्या/ मुलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वच पालकांना उपयोगी ठरतील.

डॉ. अ. ल. देशमुख

शिक्षण माणूस घडवणारे असावे असे स्वामी विवेकानंद म्हणत असत. सुरुवातीच्या दहा वर्षांपर्यंतचा काळ मुलांच्या जडणघडणीतला सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो.

या वयात मिळालेले शिक्षणाचे संस्कार दीर्घकाळ आपल्या मुलांची साथ करीत असतात. आजच्या धावपळीच्या जगातली पहिली ते दहावी या शालेय वयातल्या आपल्या मुलांना आपण छोट्या-छोट्या भासणाऱ्या मार्गांनी खूप मदत करू शकतो आणि मुलांबरोबरचे आपले बंध अधिक अर्थपूर्ण करू शकतो.

या दिशेने जाताना यातले काही संकल्प आपल्या मुलाच्या/ मुलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वच पालकांना उपयोगी ठरतील.

वाचन, लेखन, गणन या शिक्षणातल्या मूलभूत पायाभूत क्रियांवर माझ्या मुलाने/ मुलीने प्रभुत्व मिळवावे यासाठी मदत करणार. रोज दहा ओळी मोठ्याने वाचणे, दहा ओळी लिहिणे व तीसपर्यंत पाढे पाठ करणे आवश्यक आहे.

हस्ताक्षर हा जीवनात आवश्यक असलेला भाग. माझ्या मुलाचे/ मुलीचे हस्ताक्षर उत्तम असावे.

Good Parenting
Parenting : पाल्यांसाठी पालकांचा संकल्प

महिन्यातून एकदा शाळेला भेट देऊन शिक्षकांकडून माझ्या मुलाच्या/ मुलीच्या प्रगतीची माहिती घेणे. वर्गशिक्षकांशी, विषयपरीक्षकांशी चर्चा करणे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेणे. शिक्षणाचा बद‌ललेला आराखडा प्रत्येक पालकाने समजावून घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या माझ्या मुलाशी/ मुलीशी पुढील दिशेबद्दल संवाद साधणे सोपे होईल.

नकार पचवायला शिकवणार. एक किंवा दोनच मुले असल्याने त्यांचे लाड होत असतात. त्यांनी काही मागितलं की त्यांना ते मिळत असतं. परिणामी मुलं हट्टी होतात आणि नकार स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. या बाबतीत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते.

रोज किमान दहा-पंधरा मिनिटे मुलाशी/ मुलीशी शाळेविषयी, अभ्यासाविषयी चर्चा करणार. यामुळे मुलांची मनःस्थिती आनंदी राहाते व मुलांबरोबर सुसंवाद, जवळीक वाढण्यास मदत होते.

Good Parenting
Nashik Educational: पाचवी अन् आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी 60 गुणांची परीक्षा! अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा त्याच वर्गात

वयोगटानुरूप स्पर्धा परीक्षांची माहिती करून घेणार व योग्य त्या परीक्षेसाठी मुलाला/ मुलीला उत्तेजन देणार. अशा परीक्षांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

रोज मुलाला / मुलीला पाच निरीक्षणे लिहायला सांगणे. निरीक्षण क्षमता विकसित झाली तर समाज शिक्षण होते, समाज कळतो.

मी स्वतः डिजिटल साक्षर होणार आणि मुलाला/ मुलीलाही त्यात प्रभुत्व मिळविण्यास प्रवृत्त करणार, मदत करणार, संधी देणार. यामुळे काळानुरूप अनुकूलन व मुले/ मुली बहुश्रृत होण्यास मदत होईल.

ध्यान, प्राणायाम, सूर्यनमस्कार व योगासने करणार व मुलाकडून / मुलीकडून रोज करून घेणार. प्रकृती, आरोग्य उत्तम राहाते. अभ्यासाचा स्टॅमिना वाढतो व एकाग्रता निर्माण होण्यासही मदत होते.

---------------

Good Parenting
National Education Policy शिक्षणदिशा : धोरणाच्या वाटचालीवर बोलू काही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com