Premium|Global Economy and Fuel Hike : ट्रम्प-जिनपिंग भेटीनंतर जागतिक बाजारात हालचाली; भारतीय गुंतवणूकदारांनो सावध राहा!

Global Market Impact on Indian Indices 2026 : अमेरिका आणि चीनमधील व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात घडामोडी घडत असताना, भारतीय शेअर बाजारातील ‘निफ्टी’ ६३३ अंशांनी घसरल्याने गुंतवणूकदारांना सावध राहून हायब्रीड फंडांकडे वळण्याचा सल्ला देणारा विशेष लेख.
Global Market Impact on Indian Indices 2026

Global Market Impact on Indian Indices 2026

esakal

Updated on

भूषण महाजन

पंतप्रधान मोदी म्हणाले तसे, येणारे दिवस आव्हानात्मक आहेत, त्यांचा सामना करायला हवा. खर्च वाढणारच आहेत, पण उत्पन्न कसे वाढेल हे बघायला हवे. जमेल तसे नवे भांडवल रोखेबाजाराकडे किंवा हायब्रीड फंडात गुंतवायला हवे. गुंतवणूक राजा सावध राहा, रात्र (व दिवसही) वैऱ्याची आहे.

सारे जग ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या तीन दिवसांच्या भेटीकडे डोळे लावून बसले होते. अमेरिकेच्या विख्यात कंपन्यांचे मुख्य अधिकारी ट्रम्प यांच्यासोबत चीन दौरा करून आले. दौऱ्याचे फलित काय, तर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले दिसत नाही. शंभर इंच छाती पुढे काढून गेलेले तात्या शेपूट तोंडात घालून परतले. बीजिंगमधील या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर कुठलाही करार किंवा संयुक्त निवेदन झालेले नाही. आपल्या स्वभावाप्रमाणे अध्यक्ष ट्रम्प यांनी उभयतांमधील प्रमुख समस्या सोडवल्याचा दावा केला व जाहीर केले, की चीनने २०० बोइंग विमाने व अब्जावधी डॉलरचा शेतमाल आयात करण्याचे कबुल केले आहे व यासंबंधी लवकरच करार होईल. या कुठल्याही वृत्ताला चीनने दुजोरा दिला नाही. यावरून असा निष्कर्ष काढता येईल, की सदर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही देशांत संवाद सुरू झाला. ट्रम्प यांच्या केलेल्या भव्य आदरातिथ्यातून दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे आणि व्यापार युद्धात तात्पुरती शांतता राखणे इतकेच साध्य झालेले दिसते. प्रत्यक्ष सीमेवरचे युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने फारसे काही घडले नाही.

अमेरिकी व्यावसायिक शिष्टमंडळात ॲपल, टेस्ला, एनव्हिडिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रमुख सामील झाले होते. या बैठकीदरम्यान अमेरिकेने एनव्हिडिया कंपनीला तिच्या प्रगत एच२०० चिप्स मोठ्या चिनी कंपन्यांना विकण्याची परवानगी दिल्याचे कळते. त्यातून टेक क्षेत्रातील शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली व अमेरिकी बाजार त्याच्या अत्युच्च पातळीवर गेला. असो.

Global Market Impact on Indian Indices 2026
Premium|Global Economy and Fuel Hike : इराण-इस्राईल युद्ध आणि ११२ डॉलरवर गेलेले तेल! भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे नेमके काय आणि किती गंभीर परिणाम होतील?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com