Premium|Millet Recipes: ज्वारीच्या विविध पदार्थांची चविष्ट सफर

Healthy Indian Food: भरडधान्यांपासून ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई आणि ओट्सचे पौष्टिक व पारंपरिक पदार्थ तयार करता येतात. हे पदार्थ चविष्ट, पचनास हलके आणि ऊर्जा वाढवणारे असून दैनंदिन आहारासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
Millet Recipes

Millet Recipes

sakal

Updated on

ज्वारीची उसळ

वाढप

४ व्यक्तींसाठी

साहित्य

दीड वाटी ज्वारी, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, पाव वाटी ओले खोबरे, प्रत्येकी १ चमचा धने आणि जिरे पूड, थोडी चिंच, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, फोडणीसाठी तेल, २ चमचे गोडा मसाला, चवीनुसार मीठ.

कृती

ज्वारी दोन दिवस भिजत घालावी. तिसऱ्या दिवशी फडक्यात बांधून उबदार जागी ठेवून तिला मोड आणावेत. नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि मोड आलेली ज्वारी घालून चांगले परतावे. मग त्यात गरम पाणी घालून चांगले शिजवावे. यानंतर त्यात ओले खोबरे, चिंच, गूळ, धने व जिरे पूड आणि मीठ घालून चांगले उकळावे. उसळीला रस्सा हवा असेल तर त्यानुसार पाणी घालावे. चांगले शिजल्यानंतर त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि उसळ सर्व्ह करावी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com