life insurance
life insurancesakal

Insurance Planning : विमा नियोजन का व कसे करावे?

प्रत्येकाने आपली विम्याची गरज ओळखून नियोजनबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणे ही आर्थिक नियोजनामधील एक महत्त्वाची बाब आहे.

सध्या व भविष्यात विम्याचे किती कव्हर असणे आवश्यक आहे याचा विचार करून त्यानुसार विमा पॉलिसी घेणे योग्य असते.

पॉलिसी घेताना मिळणारे कव्हर कमीतकमी प्रीमिअम असणारे असावे त्यातून ठरावीक मुदतीनंतर काही रक्कम मिळावी ही अपेक्षा नसावी.

कव्हर ठरविताना आपले मासिक उत्पन्न, दर महिन्याचा खर्च, असलेले कर्जव त्याचा मासिक हप्ता याचा विचार करून आपल्या पश्चातही घरच्यांना या खर्चाची पूर्तता करता येईल, या दृष्टीनेविमा कव्हर असणे आवश्यक असते.

सर्वसाधारणपणे आपल्यावार्षिक उत्पन्नाच्या २० पट इतके कव्हर मिळू शकते, पण तेवढे घेतलेच पाहिजे असे नाही. तथापि, आपल्यावार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट इतके कव्हर घेणे योग्य असते.

life insurance
Insurance policy : तूम्ही Life Insurance अजून काढला नाही? जाणून घ्या का आहे गरज

आजकाल बहुतेक सुशिक्षित तरुण विमा घेताना पारंपरिक विमा पॉलिसी (मनी बॅक, एन्डोव्हमेंट, होल लाइफ, युलिप) न घेता टर्म इन्शुरन्स मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे दिसून येते, ही निश्चितच चांगली बाब आहे.

पॉलिसी कव्हरची रक्कम पॉलिसी घेताना जरी पुरेशी वाटत असली तरी पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष क्लेमपोटी मिळणारी रक्कम वारसदारांसाठी पुरेशी असेलच असे नाही.

या समस्येवर मात करण्यासाठी आता आपण दर वर्षी पॉलिसी कव्हर वाढत जाणारी विमा पॉलिसी घेऊ शकतो. ही पॉलिसीबाबत पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत

  • या पॉलिसीचे कव्हर दर वर्षी मूळ कव्हरच्या ५ टक्केवाढत असते.

  • बहुतांश कंपन्या सुरुवातीस जो पॉलिसी प्रीमिअम आकारतात, तोच पुढे कायम राहतो. दर वर्षीवाढत जाणाऱ्या कव्हरनुसार प्रीमिअम वाढत नाही.

  • अर्जदाराचे वय, कव्हरची रक्कम व अर्जदाराची आरोग्य स्थिती यावर सुरुवातीचा प्रीमिअम अवलंबून असतो, तसेच यात वाढत्या कव्हरचाही विचार केलेला असतो. यामुळेहा प्रीमिअम नेहमीच्या पॉलिसीच्या तुलनेने जास्त असला तरी परवडणारा असतो.

life insurance
Free Life Insurance: 7 लाखांचा मोफत विमा हवाय, जाणून घ्या काय आहे EPFO ची योजना?

आजकाल बहुतेक सर्व बँका होम लोन देताना होम लोन इन्शुरन्सबाबत आग्रही असतात व ते कर्जदाराच्याही हिताचे असते.

कर्ज रकमेइतकी होम लोन इन्शुरन्स पॉलिसी कर्ज घेतानाच दिली जाते. या पॉलिसीचा प्रीमिअम एकरकमी द्यावा लागतो व तो आपल्या कर्ज रकमेत वाढविला जातो, यामुळेहोम लोनचा ईएमआय त्या प्रमाणात वाढतो.

जसजशी कर्जाची परतफेड होते तसतसे या पॉलिसीचे कव्हर कमी होत जाते. परतफेडीच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्ज खात्यावर शिल्लक असलेली कर्ज रक्कम विमा कंपनीकडून बँकेस क्लेमपोटी दिली जातेव यातून शिल्लक कर्ज रक्कम वसूल होत असल्याने मृताच्या कुटुंबीयांना कर्ज परतफेडीची समस्या राहत नाही.

ही आयुर्विमा पॉलिसी असली तरी यातून मृताच्यावारसास रक्कम मिळत नाही. होम लोन इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम कर्ज रक्कम, कर्जाचा कालावधी, कर्जदाराचेवय वहोम लोनचा व्याज दर यावर अवलंबून असतो.

life insurance
Life Insurance: विमा एजंटने चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकली आहे? अशी मिळेल पूर्ण रक्कम, काय सांगतो कायदा?

याउलट वर उल्लेखलेली टर्म इन्शुरन्स पॉलिसी जर होम लोनसाठी असाइन करून दिली आणि त्या पॉलिसीचा वार्षिक/ सहामाही/ तिमाही/ मासिक प्रीमिअम बँकेला कर्ज खात्यास नावे टाकून देण्याबाबत सूचना दिल्यास, आपल्याहोम लोनपेक्षा जास्त रकमेची पॉलिसी घेता येते.

यामुळेवेगळी होम लोन इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागत नाही. परतफेडीच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास क्लेममधील शिल्लक कर्ज रक्कम बँकेला दिली जाईल, आणि उर्वरित रक्कम वारसास दिली जाईल.

या पॉलिसीचा प्रीमिअम पॉलिसी कव्हर, कालावधी व अर्जदाराचेवय यावर अवलंबून असतो. थोडक्यात, वाढत्या कव्हरची टर्मविमा पॉलिसी घेऊन ती घर घेताना (प्रातिनिधिक चित्र) होम लोनसाठी असाइन करणेनिश्चितच हिताचे आहे.

-----------

life insurance
Insurance Tips तुमचा क्लेम मिळवणं आहे तुमच्याच हाती! कसे ते वाचा.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com