Premium|Hunger vs Appetite : मंद झाली भूक ही!

Hunger and Appetite: What Is the Difference? : वयानुसार भूक कमी होणे स्वाभाविक असले, तरी शारीरिक भूक आणि खाण्याची इच्छा यातील फरक समजून घेणे ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.
Hunger vs Appetite

Hunger vs Appetite

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

शरीरातली साखर कमी झाली की मेंदूला संदेश जातो. घ्रेलिनसाखी हार्मोन्स या संदेशाला कारणीभूत असतात. त्यानंतर मेंदू शरीराला अन्न शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. ती शरीराची हाक म्हणजे शारीरिक भूक असते. शरीराला इंधन लागतं, ते इंधन शोधण्याची प्रेरणा भूक देते.

माझ्या आजीकडे तिची एक मैत्रीण येत असे, ती सांगे, ‘सुशीले, मी आता रात्रीचं काहीच खात नाही हो. चार शेंगदाणे दे फक्त...’ मग आणखी थोड्या वेळानं म्हणे, ‘सुशीले तोंडाला काही चव लागत नाही गं. जरा काही तरी चमचमीत खावं वाटतंय. दोन भजी तळतेस?’ असं म्हणत म्हणत चांगली भरपेट खात असे. आपल्याकडे ‘वय झालं आता कमी खावं, मग रात्री जेवूच नये’ असा काहीतरी समज असतो. मग व्यवस्थित जेवणाऐवजी लोक आजीच्या त्या मैत्रिणीसाखं सटरफटर खात बसतात. अर्थात वयोमानानुसार भूक कमी होतेच, आपण पूर्वीसारखं ‘हवं तेवढं खा’ म्हणजे ‘ऑल यू कॅन ईट’ अशा उपहारगृहात जाऊन ताव मारू शकत नाही.

दुपारी लग्नाचं जेवण केलं तर रात्रीच्या जेवणाला सुट्टी द्यावीशी वाटते. तरुणपणी लग्नात पैज मारून खाल्लेल्या पन्नास जिलब्यांच्या आता नुसत्या आठवणीच सोबत असतात. गेले ते दिन गेले! पण खूप कमी खाणं आरोग्याला अपायकारक असतं, त्यामुळे हे भुकेचं शास्त्र थोडं माहीत असणं आवश्यक असतं. मुळात ‘भूक’ म्हणजे ‘हंगर’ आणि ‘खाण्याची वासना’ म्हणजे ‘ॲपेटाइट’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घेणं आवश्यक आहे. पुष्कळदा हे दोन शब्द एकाच अर्थाचे समजून वापरले जातात. अर्थांची गल्लत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com