Premium|Medical Career Opportunities Beyond MBBS India 2026 : एमबीबीएसपलीकडील वैद्यकीय करिअर; २०२६ पर्यंत आरोग्यसेवेतील नव्या संधींचं विस्तृत विश्व

Emerging Non Doctor Career Options in Hospitals : एमबीबीएस आणि नर्सिंगच्या पारंपरिक चौकटीबाहेर पडून फिजिओथेरपिस्टपासून ते जेनेटिक कन्सल्टंटपर्यंतच्या अनेक आधुनिक तज्ज्ञांच्या एकत्रित टीमवर्कमुळे वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेल्या नव्या अभूतपूर्व करिअर संधींचा वेध घेणारा विशेष लेख.
Medical Career Opportunities Beyond MBBS India 2026

Medical Career Opportunities Beyond MBBS India 2026

esakal

Updated on

डॉ. हिमानी तपस्वी

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील संधी म्हणजे केवळ नोकरीच्या साधनांपुरत्या मर्यादित नाहीत, तर ती विज्ञान, तंत्रज्ञान, करुणा, सर्जनशीलता आणि मानव सेवा यांचा अद्‍भुत संगम असलेली जीवन मूल्ये आहेत. आरोग्य सेवा हे फक्त एक प्रोफेशन नाही, ती मानवतेला निरोगी, सक्षम आणि आशावादी ठेवण्याची एक सामूहिक चळवळ आहे.

ए क काळ असा होता, जेव्हा आरोग्य क्षेत्रातील करिअर म्हटले की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त काही मोजकीच क्षेत्रे उभी राहत; एमबीबीएस, डेंटिस्ट्री, किंवा नर्सिंग. डॉक्टर होणे म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च यश, अशी समाजाची धारणा होती. आरोग्य क्षेत्रातील इतर अनेक व्यवसायंबद्दल माहिती कमी होती आणि त्यांना पुरेशी ओळख मिळत नव्हती. परंतु गेल्या काही दशकांत आरोग्यसेवेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. आधुनिक आरोग्य व्यवस्था आता एका डॉक्टरभोवती फिरणारी व्यवस्था राहिलेली नाही. ती एक विशाल, बहुआयामी आणि अत्यंत समन्वयाने चालणारी दुनिया झाली आहे. या दुनियेत असंख्य तज्ज्ञ एकत्र येऊन रुग्णाचे निदान, उपचार, पुनर्वसन करतात; मानसिक आधारही उपलब्ध करून देतात; संशोधन करतात; एकूणच रुग्णाचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करतात.

आजघडीला रुग्ण एखाद्या क्लिष्ट सर्जरीसाठी आधुनिक रुग्णालयात दाखल झाला, तर त्याला केवळ डॉक्टर आणि सर्जनच नाही, तर उपचारप्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असेलेले फिजिओथेरपिस्ट, आवश्‍यक असेल तिथे ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, प्रोस्थेटिस्ट (कृत्रिम अवयव तज्ज्ञ), लॅब टेक्निशिअन, आयसीयू टेक्निशिअन, सायकिॲट्रिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्ट, जेनेटिक कन्सल्टंट आणि इमेजिंग टेक्निशिअन असे अनेकजण भेटतात. यावरून असे म्हणता येते, की भविष्यातील आरोग्य व्यवस्था केवळ एक-दोन डॉक्टरांपुरती सीमित नसून तिथे टीमवर्क असेल. आणि म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात संधींचे अभूतपूर्व विश्व खुले झाले आहे.

Medical Career Opportunities Beyond MBBS India 2026
नवी मुंबई महापालिकेचा सहा हजार कोटींचा फुगवटा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com