

Closing Auction Session
esakal
भूषण महाजन
ग्राहक क्षेत्र गेली दोन वर्षे तेजीची आराधना करत आहे! पण कुठे काय घडत आहे? सेमी कंडक्टर, वीज पारेषण, ट्रान्सफॉर्मर या क्षेत्रांतील शेअर महाग व अतिमहाग होत चालले आहेत. कितीही जबरदस्त निकाल लागले, तरी त्यातील खरेदीला स्टॉप लॉसशिवाय पर्याय नाही. आपला बाजार, त्यातील ऑपरेटर्स, परदेशी संस्था यांची तऱ्हा निराळीच. खूप तोडफोड निकाल लागूनही शेअर वर जाईल याची खात्री नाही.
ता. ३१ जुलैला २३७३७ अंशाचा बंद दिल्यानंतर गेले दोन सप्ताह निफ्टी २४५०० अंशावर धडक मारत होती. पण डोके फुटायची वेळ आली, तरी तिला ती पातळी काही पार करता येत नव्हती. त्यानंतर ३ ऑगस्टला निफ्टी अचानक शेवटच्या १५ मिनिटांत २०० अंशावर जाऊन २४७७४ अंशावर थांबली. साहजिकच हा ब्रेक आउट आहे असे समजून तेजीवाले पंटर्स प्रोत्साहित झाले आणि बाह्या सरसावून गुंतवणूक आखाड्यात उतरले. अनेक गुंतवणूकदारांना वाटले, की शेवटच्या दोन मिनिटांत मोठी खरेदी झाली असावी. पण खरे कारण वेगळेच होते. ३ ऑगस्टपासून एफ ॲण्ड ओ शेअरसाठी क्लोजिंग ऑक्शन सेशन ही नवी पद्धत लागू झाली आणि बाजाराचा बंद ठरवण्याची पद्धत बदलली.